संगीता बिजलानीकडून सलमानसोबतच्या नात्याला नवं नाव; ऐकून बसेल धक्का

या नात्याबद्दल तिचं हे वक्तव्य बरीच गुपितं उघड करुन गेलं... 

Updated: Sep 20, 2021, 09:44 AM IST
संगीता बिजलानीकडून सलमानसोबतच्या नात्याला नवं नाव; ऐकून बसेल धक्का  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री संगीता बिजलानी आणि अभिनेता सलमान खान ही जोडी एकेकाळी बॉलिवूडमध्ये 'टॉक ऑफ द टाऊन' होती. अनेक वर्षे हे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. किंबहुना यांचं नातं लग्नाच्या वळणापर्यंत येऊन पोहोचलं होतं. पण, या नात्यात मीठाचा खडा पडला आणि सारंकाही बिनसलं. अनेक वर्षे या नात्यावर कोणीही मोकळेपणानं काहीच बोललं नाही. पण, आता मात्र नात्याला नव्यानं वाचा फुटल्याचं दिसत आहे. 

खुद्द संगीता बिजलानीनंच या नात्यावर भाष्य केलं आहे. हल्लीच एका मुलाखतीमध्ये संगीतानं या नात्याची गुंतागुंत सोडवून सांगितली. ज्यांना तुम्ही बऱ्याच काळापासून ओळखता अशा व्यक्तींसोबत मैत्री ठेवणं चांगलं वाटतं, असं म्हणत तिनं सलमानच्याच (Salman Khan)चित्रपटातील एक डायलॉग म्हणत या नात्याला नवं नाव दिलं. 'दोस्ती की है, तो निभानी तो पडेगी ही... ' असं संगीता म्हणाली. 

सध्या कोणाच्या संपर्कात संगीता? 
आपण सध्या मीनाक्षी शेषाद्रीच्या संपर्कात असल्याचं सांगत दोघींनीही जवळपास एकसारख्याच परिस्थितीचा सामना केल्याचा उलगडा तिनं केला. सोशल मीडियाच्य़ा माध्यमातून अनेक जुन्या मित्रांच्या संपर्कात आल्याचंही संगीता म्हणाली. 

लग्नानंतर संगीतानं चित्रपट वर्तुळातून काढता पाय घेतला होता. यापूर्वी तिनं बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्य़े काम केलं होतं. 'त्रिदेव', 'हथियार', 'जुर्म' हे त्यापैकीच काही चित्रपट. हल्लीच संगीतानं 'सुपर डान्सर 4' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही हजेरी लावली होती.