अनेक मोठे अभिनेते माझ्यासोबत.... ; तापसी पन्नूचा मोठा खुलासा

तापसीनं बऱ्याच मोठ्या कलाकारांसोबतगही स्क्रीन शेअर केली आहे. पण....

Updated: Nov 4, 2021, 11:53 AM IST
अनेक मोठे अभिनेते माझ्यासोबत.... ; तापसी पन्नूचा मोठा खुलासा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट जगतातून हिंदी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या एका अभिनेत्रीला अगदी कमी वेळातच बॉलिवूडमध्ये यश मिळालं. साइंटीस्टपासून ते अगदी शार्पशूचरपर्यंत बऱ्याच आव्हानात्क भूमिका तिनं साकारल्या, ज्याला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली. ही अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू.

तापसीनं बऱ्याच मोठ्या कलाकारांसोबतगही स्क्रीन शेअर केली आहे. पण, बॉलिवूडमध्ये असेही काही ए लिस्टर कलाकार आहेत, आपल्याला अशाही कलाकारांनी नकार दिला आहे, ज्यांना तापसीचा डबर रोल आहे असं कळलं होतं. एक तापसी असतानाच आता दुसरी तापसी कशाला, असा प्रश्न उपस्थित केला. चित्रपटाच्या अखेरच्या टप्प्यात मुलीलाच सहानुभूती मिळेल या अनुषंगानं एका अभिनेत्यानं तापसीसोबतचा चित्रपट नाकारला. जे आपल्यासाठी एक अडचणीची बाब असल्याचं तिनं स्पष्ट केलं.

तापसीच्या समजावण्यापश्ताचही त्या अभिनेत्याचं मतपरिवर्तन झालं नाही. पण, त्याच्या भलत्याच अटीमुळं तापसीचं मात्र नुकसान झालं.

अभिनेते आणि चित्रपट नाकारण्याची त्यांची कैक कारणं तापसीलाही थक्क करुन जातात. असं असलं तरीही या कलाविश्वात ती मात्र आपले पाय घट्ट रोवून उभी आहे.  

आगामी चित्रपटांविषयी सांगावं तर, 'लूप लपेटा', 'शाबाश मिट्ठू', 'डियर एंड लवली', 'दोबारा' या चित्रपटांतून ती येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.