'या' चित्रपटांमध्ये बोल्ड सीनच्या नावाखाली प्रेक्षकांची फसवणूक? जाणून घ्या

बोल्ड सीनच्या नावाखाली प्रेक्षकांची फसवणूक? तुम्हाला माहितीयत का हे चित्रपट?

Updated: Nov 11, 2022, 09:41 PM IST
'या' चित्रपटांमध्ये बोल्ड सीनच्या नावाखाली प्रेक्षकांची फसवणूक? जाणून घ्या title=

मुंबई : अनेक चित्रपटांना ग्लॅमरचा टच देण्यासाठी बोल्ड सीन्स (Bold Scene) टाकले जातात. पण इतक्या लोकांसमोर बोल्ड सीन देणे काही साधी गोष्ट नाही. अशा परिस्थितीत काही अभिनेत्री (Actress) त्यांचे शूटिंग करण्यास टाळाटाळ करतात, तर काही अगदी सहजपणे शूट करतात.पण ज्या अभिनेत्रींना असे सीन शूट करताना त्रास होतो, त्यांच्यासाठी बॉडी डबल्सचा (Body Double) वापर केला जातो. हे सीन्स अशाप्रकारे शुट करण्यात येतात की प्रेक्षकांना ती अभिनेत्रीच वाटते. बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे अनेक सिनेमे आहेत, ज्यामध्ये अशाप्रकारचे प्रयोग करण्यात आले आहेत.त्यामुळे हे चित्रपट कोणते आहेत, ते जाणून घेऊयात. 
 

सनी लिओनी

बॉलिवूडमध्ये (Bollywood) बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत सनी लिओनीचे (Sunny Leaone) नाव अग्रस्थानी आहे.तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, सनीने एका चित्रपटासाठी बॉडी डबलचा वापर केला होता. सनीने 'एक पहेली लीला'मध्ये मोहित अहलावतसोबत असलेला सीन पती डॅनियलसोबत शूट केला होता. 

मल्लिका शेरावत

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा 2010 मध्ये तिचा 'हिस' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा बोल्ड सीन पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. चित्रपटात खूप बोल्ड सीन्स होते, ज्यावरून मोठा गदारोळही झाला होता. यानंतर मल्लिकाने दावा केला होता की,तिचे काही बोल्ड सीन बॉडी डबलसह शूट करण्यात आले होते. 

सीमा बिस्वास

'बँडिट क्वीन' हा फुलन देवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री सीमा बिस्वासने (Seema Biswas) मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटात एक न्यूड सीन चित्रित करण्यात आला आहे, ज्याची खुप चर्चा झाली होती. या सीनबाबत सीमा बिस्वास यांनी सांगितले होते की, हा सीन तिचा नसून तिच्या डुप्लिकेटने शूट केला होता.

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने (priyanka chopra) देखील अनेक सिनेमात बोल्ड सीन दिले आहेत. मात्र तिच्या 'सात खून माफ' मधील बोल्ड सीनने एकच खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटात प्रियांकाचा न्यूड सीन होता,पण हा सीन अभिनेत्रीने नाही तर तिच्या बॉडी डबलने शूट केला होता.

दरम्यान हे काही चित्रपट होते, ज्यामध्ये अभिनेत्रींच्या जागी त्याचा बॉ़डी डबलचा (Body Double) वापर करून बोल्ड सीन शुट करण्यात आले होते. बॉडी डबल हे ते कलाकार असतात जे अभिनेत्यांसारखेच दिसतात, फक्त ते अभिनेत्याच्या जागी सिनेमात डूप्लिकेटचा रोल करतात.