कोरोनाच्या चिंतातूर वातावरणात कलाविश्वातून आली गोड बातमी

कोरोना Coronaviru व्हायरसची दहशत सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. 

Updated: Apr 6, 2020, 10:04 AM IST
कोरोनाच्या चिंतातूर वातावरणात कलाविश्वातून आली गोड बातमी
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : कोरोना Coronaviru व्हायरसची दहशत सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या या काळात प्रत्येकजण या कोरोना विषाणूमुळे होणारा कहर आतातरी थांबावा अशीच प्रार्थना करत आहेत. या सर्व परिस्थितीतीत मानसिक तणाव आणि वातावरणात चिंता पसरणं स्वाभाविक आहे. पण, त्यातही आनंदी राहण्याची अनेक कारणं मात्र दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. 

कोरोनाच्या या चिंतातूर वातावरणात सध्या कलाविश्वातून एक अतिशय गोड बातमी समोर येत आहे. ही बातमी एका अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. 

वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मानवर राज्य करणाऱ्या अभिनेता सुमीत व्यास हा तोच अभिनेता ज्याने चेहऱ्यावर हसू येण्याचं एक कारण सर्वांना दिलं आहे. सुमीत व्यास आणि त्याची पत्नी, अभिनेत्री एकता कौल यांच्या वैवाहिक नात्यात आता नव्या पाहुण्याण्याच्या येण्याची चाहूल लागली आहे. 

 

एकता आणि सुमीत या दोघांनीही अतिशय आकर्षक अशा कॅप्शनसह त्यांच्या होणाऱ्या बाळाची माहिती चाहत्यांना दिली. ज्यानंतर कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या सेलिब्रिटी जोडीच्या जीवनातील ही आनंदवार्ता पाहता सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात ही बातमी म्हणजे एक सकारात्मकतेचा किरण आहे, अशी प्रतिक्रियाही काही चाहत्यांनी दिली.