बॉलिवूडकर म्हणतात, 'दीप-वीरची दृष्ट काढा'

जाणून घ्या कोणी- कोणी दिल्या या नव्या जोडीला शुभेच्छा 

Updated: Nov 15, 2018, 12:55 PM IST
बॉलिवूडकर म्हणतात, 'दीप-वीरची दृष्ट काढा'

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या वृत्ताची अधिकृत घोषणा केल्यानंतर सोशल मीडिया म्हणू नका किंवा मग संपूर्ण कलाविश्व. प्रत्येक ठिकाणी याच जोडीला शुभेच्छा देण्यासाठीची लगबग पाहायला मिळत होती. 
घरातीलच एखाद्या व्यक्तीचं लग्न असल्याचा आनंदच जणू प्रत्येकाला झाला होता. 

सर्वत्रच आनंद, उत्साहाच्या या वातावरणात आपल्या लाडक्या जोडीला शुभेच्छा देत निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने एक ट्विट केलं. बधाई हो... असं म्हणत कोणीतरी यांची दृष्ट काढा असंही तो या ट्विटमधून म्हणाला. 

करणमागोमाग, निम्रत कौर, सिम्मी गरेवाल, उर्वशी रौतेला, रोनित रॉय, कुब्रा सैत यांनी आणि इतरही मंडळींनी बॉलिवूडच्या 'राम लीला'ला या नव्या प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. 

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित हिनेही या जोडीला शुभेच्छा देत येणारा सहजीवनाचा काळ हा त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक सुरेख काळ ठरो, अशी सदिच्छा दिली. 

बुधवारी इटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका आणि रणवीर लग्नाच्या बेडित अडकले. ज्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिंधी पद्धतीने ते विवाहबद्ध होत आहेत. सर्व परंपरा, कुटुंबीयांची साथ आणि चाहत्यांचं अमाप प्रेम या साऱ्याच्याट बळावर हे दोघंही आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.