पाहा कोण आहे, विराट- अनुष्काचा Bodyguard; ज्याच्या पगाराचा आकडा कायच्या काय तगडा

तो विरुष्काच्या कुटुंबातीलच सदस्य...   

Updated: Aug 30, 2021, 08:12 PM IST
पाहा कोण आहे, विराट- अनुष्काचा Bodyguard; ज्याच्या पगाराचा आकडा कायच्या काय तगडा  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सेलिब्रिटी म्हटलं, की त्यांच्या मागेपुढे चाहत्यांची गर्दी आलीच. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना शब्दांतही व्यक्त करता येणार नाही, इतकं प्रेम मिळतं. चाहत्यांची ही गर्दी प्रत्येक वेळी चांगलेच अनुभव देते असं नाही. अनेकदा काही असे प्रसंगही घडतात जेव्हा गर्दीचा दुरुपयोग करत काही अनुचित प्रकारही घडतात. 

सर्व संभाव्य संकटं आणि परिस्थिती पाहता अखेर सेलिब्रिटी मंडळी पर्सनल बॉडीगार्ड आपल्यासोबत ठेवतात. ही मंडळी जिथं जातात तिथं हे बॉडीगार्ड त्यांच्यासोबत जातात. बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचे बॉडीगार्डही लाखोंच्या घरात कमाई करतात. 

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांच्यापासून शाहरुख खानपर्यंत (shahrukh khan) आणि दीपिकापासून ते अगदी अनुष्कापर्यंच बहुतांश सेलिब्रिटी पर्सनल बॉडीगार्ड आपल्यासोबत ठेवतात. अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) पर्सनल बॉडीगार्डचं नव आहे सोनू. प्रकाश सिंह असं त्याचं खरं नाव. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याला अनुष्काच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

Shahrukh Khan च्या बॉडीगार्डचा पगार ऐकून तुमच्या ही भूवया उंचावतील

विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी विवाहबंधनात अडकण्यापूर्वीपासूनच प्रकाश ही जबाबदारी पार पाडत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का यासाठी प्रकाशला पगार स्वरुपात मोठी रक्कम मोजते. माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार विरुष्काकडून या बॉडीगार्डसाठी वर्षाला 1.2 कोटी रुपये इतका पगार मोजला जातो. कोणा एका मोठ्या कंपनीच्या CEO च्या पॅकेजचा आकडा या घरात असतो हेसुद्धा तितकंच खरं. 

सोनू, विरुष्काच्या कुटुंबातील सदस्य 
अनुष्का आणि विराटसाठी सोनू अर्थात प्रकाश हा फक्त एक बॉडीगार्डच नसून, तो आता त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य झाला आहे. अनुष्का दरवर्षी त्याचा वाढदिवसही तितक्य़ाच उत्साहात साजरा करते. 

अनुष्काप्रमाणंच सोनू अनेकदा विराटसोबतही बॉडीगार्ड म्हणून दिसतो. विराटच्या संरक्षणासाठी त्याची एक वेगळी टीम आहे, असं असलं तरीही सोनूवरील विश्वासापोटी हे काम अनेकदा त्याच्याकडे सोपवलं जातं. अनुष्काच्या गरोदरपणाच्या काळात ती विविध प्रोजेक्टसाठी काम करत असतानाच तिच्या सुरक्षेची जबाबदारीही सोनूवर सोपवण्यात आली होती.