बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) चित्रपटांचं बजेट वाढण्यासाठी एजन्सी, एजंट्स कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला आहे. यावेळी त्याने शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानचाही (Shahrukh Khan) उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं. इंडस्ट्रीतील हे तिघे मोठे स्टार सर्वात जास्त कॉस्ट कॉन्शिअस असल्याचं अनुराग कश्यपने 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
"मी मोठ्या स्टार्ससह काम करत नाही. पण इंडस्ट्रीत आपले तीन सर्वात मोठे स्टार शाहरुख, आमीर आणि सलमान जास्त कॉस्ट कॉन्शिअस आहेत. हे तिघेही चित्रपटासाठी मानधन घेत नाहीत, याउलट बॅकएण्ड पाहतात. प्रॉफिट शेअरिंग, ओटीटी राईट अशा गोष्टी घेतात. त्यांचा कोणताही चित्रपट महाग नसतो. यामुळे चित्रपटावर फ्रंट लोड येत नाही. तुम्ही गाडीवर फ्रंट लोड टाकलात तर गाडी वाकडी होईल"," असं अनुराग कश्यप म्हणाला.
"एजंट्स, एजन्सी यासाठी कारणीभूत आहेत. या एजन्सी मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट यांचंही प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचंही बॅकएण्ड घेतात. यामुळे कॉस्ट वाढते. यामुळे आज इंडस्ट्रीची प्रकृती बिघडली आहे. हे आधी होत नव्हतं," असा आरोप अनुराग कश्यपने केला आहे.
"ओटीटी आल्यापासून हे सुरु झालं आहे. 2017 नंतर याची सुरुवात झाली. ओटीटी इन्फ्लुएन्सर्स इंडस्ट्रीत येत आहेत. आता ओटीटी प्लॅटफॉर्म्सच ज्यांचे फॉलोअर्स जास्त ते अभिनेते असल्याचं सांगत आहेत. ज्यांना याची समस्या आहे, त्यांनीच ती सुरु केली आहे. 'जाने भी दो यारो' आणि 'अर्धसत्य' हे चित्रपट 2 लाखात तयार झाले होते. सर्वात महागडा चित्रपट 'रुप की रानी, चोरो का राजा' तर 10 कोटीत तयार झाला होता," अशी आठवणही त्याने करुन दिली.
'काम तर सगळेच करतात आणि कामाप्रमाणे प्रत्येकाला पैसे मिळायला हवेत. ज्या अभिनेत्यांना जास्त पैसे मिळतात, त्यांचा खराब चित्रपटही चांगली ओपनिंग घेतो. ज्याप्रमाणे सलमान खान आहे. सलमान खानचा कोणताही चित्रपट चांगला ओपनिंग घेतो. जर तुम्ही ओपनिंग देत असाल तर पैसे घ्या. त्यात समस्या असण्याचं कारण नाही,' असं अनुराग कश्यपने स्पष्ट सांगितलं.