Ind Vs Pak सामन्यात उर्वशी रौतेला येताच सगळे हैराण; पाहा कोणत्या खेळाडूशी वाढतेय जवळीक

सोशल मीडियावर तिची एक झलक दिसताच असंख्य मीम्सना उधाण...

Updated: Oct 25, 2021, 08:26 AM IST
Ind Vs Pak सामन्यात उर्वशी रौतेला येताच सगळे हैराण; पाहा कोणत्या खेळाडूशी वाढतेय जवळीक
छाया सौजन्य- सोशल मीडिया

शारजाह : T20 क्रिकेट विश्वचषकामध्ये रविवारच्या ब्लॉकबस्टर सामन्यात पाकिस्तानच्या संघानं बलाढ्य भारताचा पराभव केला. हा सामना अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. कुठे कोणी पाकिस्तानच्य खेळाडूंच्या संयमाची प्रशंसा केली, तर कोणी त्यांच्या संपूर्ण संघाची. भारतीय संघात रविवारच्या सामन्यात सुसूत्रता दिसत नसल्याची खंत क्रीडारसिकीं व्यक्त केली. याच सर्व चर्चांमध्ये एक विषय जरा जास्तच प्रकाशझोतात दिसला. तो विषय म्हणजे, एका व्यक्तीची उपस्थिती.

ही व्यक्ती स्टँडमध्ये संघाला साथ देताना दिसली आणि इथं भारतीय क्रिकेटरसिकांच्या भुवया उंचावल्या. ही व्यक्ती म्हणजे अभिनेत्री उर्वशी रौतेला. भारत- पाकिस्तान सामना पाहण्यासाठी क्रीडारसिकांसोबतच या गर्दीत एक खास चेहरा दिसला आणि मग काय, संघातील एका क्रिकेटपटूची क्रीडासिकांनी फिरकी घेण्यास सुरुवात केली.

उर्वशी आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत यांचं नाव काही काळापूर्वी एकत्र घेतलं जात होतं. ही जोडी डिनर डेटवरही गेल्याचं म्हटलं गेलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार पुढे जाऊन ऋषभनं उर्वशीला व्हॉट्सऍपवर ब्लॉक केलं होतं. ज्यानंतर त्याच्या आणि उर्वशीच्या रिलेशनशिनपच्या चर्चांना पूर्णविराम लागला होता.

ईशा नेगी हिच्यासोबत पंतने फोटो पोस्ट केल्यामुळं या चर्चा शमल्या होत्या. नात्याता आलेल्या या टप्प्यानंतर आता उर्वशी थेट भारत- पाकिस्तान सामन्याच्या निमित्तानं क्रिकेट स्टेडियममध्ये आल्याचं पाहून चाहत्यांना धक्काच बसला. तिची आणि पंतची जवळीक पुन्हा वाढतेय का, अशा चर्चा आणि असे प्रश्न अनेकांनीच उपस्थित केले. पंतला चिअर करताना दिसणारी उर्वशी आणि तिचा उत्साह पाहून काहींनी तर, उर्वशी उर्वशी टेक इट इजी उर्वशी .... असंही म्हटलं. एकिकडे क्रिकेटचा उत्साह असताना दुसरीकडे उर्वशीचा उत्साह सर्वांसाठीच नवा होता.