'या' व्यक्तीशी राखीने बांधली लग्नगाठ

बऱ्याच काळापासून.... 

Updated: Aug 5, 2019, 11:00 AM IST
'या' व्यक्तीशी राखीने बांधली लग्नगाठ
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : हिंदी कलाविश्वात आयटम गर्ल म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत काही दिवसांपासून सोशल मीडियावर लक्षवेधी फोटो पोस्ट करत आहे. राखी पोस्ट करत असणारे फोटो हे कायमच चर्चेचा विषय ठरतात. पण, यावेळी ते जरा जास्तच प्रकाशझोतात आले, कारण या फोटोंमध्ये ती एका नववधूच्या रुपात दिसत होती. 

सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या याच फोटोंविषयी राखीने आता एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. 'स्पॉटबॉय ई'ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपण विवाहबंधनात अडकल्याची कबुली दिली आहे. माझं त्याच्यावर फार प्रेम आहे आणि मी माझ्याच एका चाहत्याशी लग्न केलं आहे. एक असा चाहता जो फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करतो, असं राखी म्हणाली. 

'रितेश असं त्याचं नाव आहे. तो युकेस्थित व्यावसायिक आहे. तो युकेमध्येच आहे. किंबहुना तो परतला आहे. माझ्या व्हिसाची कामं सुरु आहेत. मी सहाजिकच काही दिवसांनी तेथे रवाना होणार आहे', असं म्हणत राखीने तिच्या लग्नाविषयीची माहिती दिली. 

भारतात कामाच्या निमित्ताने परतत राहणार असल्याची माहिती तिने दिली. शिवाय बऱ्याच काळापासून टेलिव्हिजन कार्यक्रमांची निर्मिती करण्याची आपली इच्छा होती जी आता साकार होणार आहे, असं म्हणत एक चांगला व्यक्ती पती म्हणून आपल्या आयुष्यात आणल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले. 

अशी झाली त्यांची ओळख... 

प्रभू चावला यांच्यासोबतची आपली मुलाखत पाहिल्या नंतर त्याने (चाहत्याने आणि सध्याच्या पतीने) मला मेसेज केला. बोलता बोलता आम्ही चांगले मित्र झालो, असं म्हणत हे सारंकाही जवळपास एक- दीड वर्षापूर्वी झाल्याचं राखीने स्पष्ट केलं.