सलमानच्या 'दबंग'शाहीचा बॉक्स ऑफिसवर दणका

'दबंग ३' या चित्रपटाने आतापर्यंत कमवला इतका गल्ला 

Updated: Dec 22, 2019, 07:22 PM IST
सलमानच्या 'दबंग'शाहीचा बॉक्स ऑफिसवर दणका title=
दबंग ३

मुंबई :  Salman Khan  सलमान खानने २०१९ या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांना Dabangg 3 'दबंग ३' या चित्रपटाच्या निमित्ताने मनोरंजनाचा एक अफलातून नजराणा दिला. नवोदित अभिनेत्री सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह सहकलाकारांच्या साथीने हा सलमान प्रेक्षकांच्या भेटीला आलाय चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्याविषयीच्या कमाईबाबत उत्सुकता व्यक्त केली जात होती. त्याचेच पडसाद आता कमाईच्या आकड्यांच्या चढत्या आलेखात दिसत आहेत. 

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांतच चांगला वेग पकडला असून, कमाईचे आकडे ४९ कोटींपर्यंत पोहोचले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. सध्याच्या घडीला देशात सुरु असणाऱ्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत सुरु असणाऱ्या निदर्शनांचा फटकाही या चित्रपटाला बसला आहे. 

समीक्षकांच्या संमिश्र प्रतिसादात या चित्रपटाला जवळपास ७.५ ते ९ कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचं आदर्श यांनी सांगितलं. या चित्रपटाने शुक्रवारी २४.५० कोटी, शनिवारी २४.७५ कोटी रुपयांची कमाई केली. रविवारपर्यंत हे आकडे ४९.२५ कोटींवर पोहोचले, असं आदर्श यांच्या ट्विटमधे लिहिलं होतं. 

विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

पहिल्या दोन दिवसांतच या चित्रपटाने ४९ कोटींचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता पुढच्या दोन दिवसांमध्ये हे आकडे १०० कोटींवर पोहोचतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'दबंग' या चित्रपटातील पहिल्या दोन चित्रपटांना मिळालेलं यश पाहता आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या वाट्याला कितपत यश येतं हे पाहणं अतीशय औत्सुक्याचं ठरणार आहे.