Amitabh Bachchan यांच्यामुळे या प्रसिद्ध अभिनेत्याच्या गुडघ्याला मोठी दुखापत, धक्कादायक खुलासा

  'महाराणी 2'   (Maharani 2) स्टार अमित सियाल याने (Amit Sial) मोठा  खुलासा केला आहे की, बिग बी अमिताभ बच्चन  (Amitabh Bchchan) यांच्यापासून प्रेरित होऊन त्याने अभिनय करण्यास सुरुवात केली होती आणि सुपरहिरोमुळेच तो एकदा दुखावला गेला होता.

Updated: Sep 16, 2022, 10:08 AM IST
Amitabh Bachchan यांच्यामुळे या प्रसिद्ध अभिनेत्याच्या गुडघ्याला मोठी दुखापत, धक्कादायक खुलासा   title=

Amitabh Bachchan Amit Sial:  'महाराणी 2'   (Maharani 2) स्टार अमित सियाल याने (Amit Sial) मोठा  खुलासा केला आहे की, बिग बी अमिताभ बच्चन  (Amitabh Bchchan) यांच्यापासून प्रेरित होऊन त्याने अभिनय करण्यास सुरुवात केली होती आणि सुपरहिरोमुळेच तो एकदा दुखावला गेला होता.

Amit Sial Knee Facture: वेब सिरीज 'महाराणी 2' चा   (Maharani 2)अभिनेता अमित सियाल (Amit Sial) याने खुलासा केला की मेगास्टार अमिताभ बच्चन  (Amitabh Bchchan) हे त्यांचे प्रेरणास्थान कसे बनले आणि अमितला त्यांच्यासारखे स्टंट करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. अमित म्हणाला, “मला त्याच्याकडून प्रेरणा मिळाली कारण ते 25 व्या मजल्यावरून उडी मारायचे आणि आरामात चालयचे. मी जेव्हा 7 किंवा 8 वर्षांचा होतो तेव्हा मी एक दिवस उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या चुलत भावासोबत उडी मारली आणि माझ्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली. मला असे वाटते की, अमिताभजी हे करु शकतात तर मीही का करु शकत नाही.

बिग बींनी अभिनेता बनण्याची प्रेरणा दिली

सियाल 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'महाराणी 2' या वेब सीरिजच्या सहकलाकारांसह अमित सियाल (Amit Sial) दिसत आहे, ज्यात हुमा कुरेशी, सोहम शाह, प्रमोद पाठक, दिव्येंदू भट्टाचार्य आणि अनुजा साठे यांचा समावेश आहे. तो म्हणाला की बिग बींनी त्यांना अभिनेता बनण्याची प्रेरणा दिली आणि ते त्यांच्या चित्रपटांचे फर्स्ट डे शो पाहायचे.

Amitabh Bachchan की वजह से टूटे इस मशहूर अभिनेता के घुटने, किया हैरान करने वाला खुलासा

कानपूरमध्ये एक टॉकी असायचा 

अमित सियाल पुढे म्हणाले, "अमिताभ बच्चन साहेब हे माझ्यासाठी प्रेरणास्थान होते. चित्रपटसृष्टीतील त्या काळात त्यांनी राज्य केले होते. मला अजूनही आठवते की माझ्या गावी कानपूरमध्ये एक टॉकी असायचा. जिथे आमचा बुटांचा व्यवसाय होता आणि त्यामुळे आम्हाला तिकीट मिळायचे.  मी आणि माझा भाऊ चित्रपटाच्या पहिल्या दिवशी पहिल्या शोला जायचो. अमिताभ बच्चन यांना मोठ्या पडद्यावर पाहिल्यानंतर मी जवळपास दोन तास बाहेर पडून अमिताभजींच्या पात्राप्रमाणे अभिनय करण्याचा प्रयत्न करायचो."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amit Sial (@amit.sial)

'महाराणी' व्यतिरिक्त अमित 'जमतारा-सबका नंबर आएगा' आणि 'इनसाइड एज'साठीही ओळखला जातो. हा शो 'द कपिल शर्मा शो' सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.