प्रियंका चोप्रा Miss World झाली तेव्हा असा दिसत होता निक जोनस, Photo झाला व्हायरल

प्रियंका मिस वर्ल्ड झाली तेव्हा निक जोनस किती वर्षांचा होता?

Updated: Sep 11, 2022, 10:10 PM IST
प्रियंका चोप्रा Miss World झाली तेव्हा असा दिसत होता निक जोनस, Photo झाला व्हायरल

Entertainment News : बॉलिवूडमधल्या (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra). अनेक हिट चित्रपट देणारी प्रियंका चोप्रा बॉलिवूमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीत प्रियंका चोप्राने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार पटकावले आहेत. 2016 मध्ये भारताने सरकारने प्रियंका चोप्राला पद्मश्री (Padma Shri Award) देऊन सन्मानित केलं. तर टाइम मासिकाने (time magazine) जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये तिला स्थान दिलं होतं. फोर्ब्सने (forbes magazine) तिचा जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश केला होता.

'मिस वर्ल्ड' प्रियंका चोप्रा
उत्तर प्रदेशातल्या बरेली शहरात जन्मलेल्या प्रियंका चोप्राने आज बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत (Hollywood) आपला ठसा उमटवला आहे. 2000 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने मिस वर्ल्डचा (Miss World) किताब पटकावला. यानंतर प्रियंका चोप्रासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले आणि मग तिने मागे वळून पाहिलं नाही. बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंकाने अनेक हिट चित्रपट दिले. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने हॉलिवूडपर्यंत मजल मारली.

प्रियंका चोप्र आणि निकचं लग्न
प्रियंका चोप्रा प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनसबरोबर (Nick Jonas) विवाहबद्ध झाली. निक किंवा निकोलस जेरी जोनस एक अमेरिकन गायक, लेखक, अभिनेता आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्याने अभिनय करायला सुरुवात केली. प्रियांका चोप्राला  निक जोनासने प्रपोज केलं. त्यानंतर जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर निक आणि प्रियांकाने 2018 साली जोधपूरमध्ये एकमेकांशी लग्न केलं. हा विवाह हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजानुसार पार पडला.

प्रियंका मिस वर्ल्ड झाली तेव्हा निक जोनस किती वर्षांचा होता?
प्रियंका आणि निक जोनसची जोडी नेहमीच चर्चेत असते. यातलं प्रमुख कारण म्हणजे या दोघांमधलं वयाचं अंतर. निक जोनस प्रियंका चोप्रापेक्षा तब्बल 11 वर्षांनी लहान आहे. प्रियंका चोप्रा आता 39 वर्षांची आहे तर निक 28 वर्षांचा आहे. म्हणजे 2000 साली प्रियंका जेव्हा मिस वर्ल्ड झाली तेव्हा निक जोनस केवळ 8 वर्षांचा होता. 

सोशल मीडियार सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. निक जोनसचा हा लहानपणीचा फोटो आहे. जेव्हा प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड बनली. त्याच वर्षींचा म्हणजे 2000 सालचा हा फोटो आहे. नीकचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजर्सने लिहिलंय 'तेव्हा कोणाला अंदाजही नव्हता की हा मुलगा एक दिवस मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करेल'. 

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसमधल्या वयाच्या अंतरावरुन त्यावेळी अनेकांनी टीका केली होती. प्रियंकापेक्षा तो किती लहान आहे, यांची जोडी कशी दिसते? अशा कमेंट्स दिल्या गेल्या होत्या. पण प्रियंका आणि निकने टीकाकारांकडे दुर्लक्ष केलं. आता  चार महिन्यापूर्वी म्हणजे जानेवारीमध्ये प्रियंका आणि निक आई-बाबा झाले. प्रियंका आणि नकने आपल्या मुलीचे खूपच हटके नाव ठेवलं आहे. प्रियंका आणि निकने आपल्या मुलीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ (Malti Marie Chopra Jonas) असं ठेवलं आहे.