शेरशाहच्या गाण्याची जादू विदेशात, ही जोडी गाजवतेय सोशल मीडिया

 सध्या सोशल मीडियावर लिप्सिंगची क्रेझ प्रचंड वाढली आहे. 

Updated: Nov 30, 2021, 08:24 PM IST
शेरशाहच्या गाण्याची जादू विदेशात, ही जोडी गाजवतेय सोशल मीडिया

मुंबई : सध्या सोशल मीडियावर  लिप्सिंगची क्रेझ प्रत्येकात वाढली आहे. विशेषत: इन्स्टाग्रामवर रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका परदेशी कपलचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो चाहत्यांना विशेष आवडला आहे. इंस्टाग्रामवर काइली पॉल नावाच्या व्यक्तीने त्याच्या हँडलवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो बॉलीवूड गाण्यांवर  लिप्सिंग करताना दिसत आहे. मात्र अलीकडेच त्याने शेरशाह चित्रपटातील सगळ्यात लोकप्रिय गाणं 'राता लांबिया' वर जबरदस्त  लिप्सिंग केलं आहे, जे यूजर्सची मनं जिंकत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे
काइली पॉल नावाच्या व्यक्तीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघंही शेरशाह चित्रपटातील 'राता लांबिया' या सगळ्यात लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त  लिप्सिंग करताना दिसत आहेत. कियारा अडवाणीनेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याचं चाहत्यांनी खूप कौतुक केलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली
या चित्रपटात कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिसले होते. दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली होती. हा चित्रपट विक्रम बत्रा यांच्या कथेवर आधारित आहे. दुसरीकडे, कियाराच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर कियारा 'जुग-जुग जिओ'मध्ये दिसणार आहे.