आता सुनील शेट्टी धावून आला....कोरोना रुग्णांसाठी उभारतोय मोफत ऑक्सिजन केंद्रे

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात खळबळ उडाली आहे. कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा दररोज वाढतच चालला आहे.

Updated: Apr 29, 2021, 03:39 PM IST
आता सुनील शेट्टी धावून आला....कोरोना रुग्णांसाठी उभारतोय मोफत ऑक्सिजन केंद्रे title=

मुंबई : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात खळबळ उडाली आहे. कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा दररोज वाढतच चालला आहे. त्याच बरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर आणि उपचारासाठी लागणाऱ्या औषधांवर त्याचा ताण पडला आहे. त्यामुळे काही अत्यावश्क म्हणून वापल्या जाणाऱ्या गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचे अनेक तारे कोरोना विषाणूमुळे पीडित रूग्णांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचे नावही या यादीमध्ये आले आहे.

सुनील शेट्टीने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सुनील शेट्टी कोरोना व्हायरस ग्रस्त रूग्णांना मोफत ऑक्सिजन केंद्रे देण्याच्या मोहिमेमध्ये सामील झाला आहेत. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून संक्रमीत लोकांना मदत करण्याची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर, सुनील शेट्टीने त्याच्या चाहत्यांनाही आवाहन केले आहे की, त्यांनी पुढे येऊन इतर कोरोना रुग्णांची मदत करावी.

सुनील शेट्टीने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर लिहिले की, "आपण सगळे कठीण काळातून जात आहोत, पण आपल्यापैकी काही लोकं पुढे येऊन बाकी लोकांची मदत करत आहेत. जे सगळ्यांसाठी एक आशेचा किरण आहे." त्याने आपल्या ट्वीटच्या माध्यमातून सांगितले की, तो केवीएन फाउंडेशन सोबत जोडला गेला आहे आणि तो त्याच्यामार्फत लोकांना विनाशुल्क ऑक्सिजन केंद्रे उप्लब्ध करुन देणार आहे.

सुनील शेट्टीने आपल्या पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, "सर्व मित्र आणि चाहत्यांना आवाहन आहे की, जर एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज भासल्यास  किंवा आपल्याला या मोहिमेमध्ये सामील होण्याची इच्छा असेल तर, कृपया थेट संदेश पाठवा. कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच लोकांना मदत करण्यासाठी आमची मदत करा." सुनील शेट्टीचे हे दोन्ही ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सुनील शेट्टीच्या या ट्वीटवर लोकं त्याचे खूप कौतुक करत आहेत. सुनील शेट्टी व्यतिरिक्त बॉलीवूडचे अन्य कलाकारही कोरोना विषाणूमुळे पीडित रूग्णांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. अभिनेता अजय देवगणनेही कोरोना संक्रमीत रुग्णांना मदतीचा हात दिला आहे आणि मुंबईतील मॅरेज हॉलचे कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतर केले आहे.

अजय देवगणने आपल्या एनवाय फाउंडेशन या सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून मुंबईत शिवाजी पार्क येथे इमर्जन्सी मेडिकल युनिट उभारण्यात हातभार लावला आहे. शिवाजी पार्कच्या मॅरेज हॉला 20 बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सपोर्ट आणि पॅरा मॉनिटर्स उप्लब्ध करुन कोविड -19 च्या सुविधांमध्ये रुपांतर केले आहे.

अजय देवगणच्या या कामात चित्रपट निर्माते आनंद पंडित, बोनी कपूर, लव्ह रंजन, रजनीश खानुजा, लीना यादव, आशिम बजाज, समीर नायर, दीपक धार, ऋषी नेगी, उद्योजक तरुण राठी आणि अॅक्शन-डायरेक्टर आरपी यादव यांनीही हात भार लावला आहे.