बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटीच्या मुलानं आयुष्य संपवलं; 'तो' प्रसंग थरकाप उडवणारा

माणूस आयुष्य संपवण्याच्या निर्णयावर पोहोचतो तेव्हा त्याची मानसिक स्थिती नेमकी कोणत्या वळणावर आलेली असते

Updated: Mar 22, 2022, 12:30 PM IST
बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटीच्या मुलानं आयुष्य संपवलं; 'तो' प्रसंग थरकाप उडवणारा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अनेकदा माणूस आयुष्य संपवण्याच्या निर्णयावर पोहोचतो तेव्हा त्याची मानसिक स्थिती नेमकी कोणत्या वळणावर आलेली असते, याचा तर्क लावणंही कठीण होऊन बसतं. 

सध्या बी टाऊनमधील अशाच एका सेलिब्रिटीसोबत नियतीनं फार वाईट खेळ केला आहे. होळी पार्टीवरून परतल्यानंतर या सेलिब्रिटीच्या 18 वर्षीय मुलाचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

ही सेलिब्रिटी म्हणजे Torbaaz चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मलिक. 

सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी गिरीश यांच्या मुलानं म्हणजेच मन्नन यानं आत्महत्या केली असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केलं आहे. आणखी मद्यपान करु नको असं वडिलांनी सांगूनही त्यांचं न ऐकता त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. 

होळी सेलिब्रेशनवरून परतल्यानंतर मन्नन दारुच्या नशेत होता. घरीही त्यानं दारू पिणं सुरुच ठेवलं होतं. यानंतर वडिलांनी त्याला शाब्दिकरित्या रागे भरलं. पण, तो वडिलांचं ऐकला नाही. 

मन्ननचा संताप अनावर झाला आणि त्यानं रागात जाऊन खिडकी तोडून खाली वाकण्याचा प्रयत्न केला. त्याहीपूर्वी तो आईवरही अनेकदा रागवला होता. 

हाती आलेल्या माहितीनुसार वडील त्यांच्या खोलीत असताना आणि आई बहुधा स्वयंपाकघरात असताना मन्नननं खिडकीतून उडी मारल्याचं सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, सदर प्रकरणाचा तपास पोलीस करत असल्याचंही म्हटलं जात आहे.