'वडिलांवर विश्वास ठेवला तर...' जन्मदात्या वडिलांबद्दल सोनाक्षीचे मोठं वक्तव्य

खासगी आयुष्यामुळे जन्मदात्या वडिलांवर विश्वास ठेवायला घाबरते सोनाक्षी सिन्हा, म्हणाली...  

Updated: Mar 22, 2022, 12:51 PM IST
'वडिलांवर विश्वास ठेवला तर...' जन्मदात्या वडिलांबद्दल सोनाक्षीचे मोठं वक्तव्य title=

मुंबई : 'थप्पडसे डर नाही लगता सहाब प्यारसे लगता है....' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशन आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. सोनाक्षी आता सिनेमा किंवा वेब सीरिजमुळे नाही तर वडिलांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. 

सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर अभिनेत्री लग्न कधी करणार असा प्रश्न चाहत्यांकडून सतत विचारला जात आहे. यावर सोनाक्षी एका मुलाखतीत म्हणाली की, 'माझे आई-वडील माझ्यासाठी मुलगा शोधू शकत नाहीत...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनाक्षी पुढे म्हणते, 'मुलगा शोधण्याची जबाबदारी जर मी वडिलांना दिली तर मी आयुष्यभर अविवाहित राहिल. त्यांनी शोधलेला मुलगा मला आवडेल यावर मला विश्वास नाही...'

सोनाक्षीची आई देखील तिला अनेकदा लग्नाबद्दल विचारत असते. त्यामुळे सोनाक्षी कधी लग्न करते ही प्रतीक्षा फक्त तिच्या चाहत्यांनाचं नाही तर तिच्या कुटुंबाला देखील आहे.