माझ्या नवऱ्याची बायको: जिच्यासाठी अनवाणी सिद्धीविनायक दर्शन घेतले, तीच सवत होईल वाटलं नव्हतं!

Mona Kapoor Birthday :  मोना कपूर यांचा आज स्मृतीदिन आहे. मोना कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आणि अर्जुन कपूरची आई आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 3, 2024, 08:00 AM IST
माझ्या नवऱ्याची बायको: जिच्यासाठी अनवाणी सिद्धीविनायक दर्शन घेतले, तीच सवत होईल वाटलं नव्हतं! title=
(Photo Credit : Social Media)

Mona Kapoor Birthday : चित्रपट निर्माता बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या विषयी कोणाला माहित नाही. बोनी कपूर त्यांच्या या लग्नामुळे चांगलेच चर्चेत होते. पण बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी विषयी खूप कमी लोकांना माहित आहे. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न करण्याआधी मोना शौरी यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं असून अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर अशी त्यांची नावं आहेत. आज 3 फेब्रुवारी मोना शौरी यांचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं काही गोष्टी जाणून घेऊया. 

एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी त्यांचं कुटुंब आणि काम यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. त्यापैकी एक म्हणजे त्यांचा फ्लॉप झालेला चित्रपट. त्यांनी सांगितलं की श्रीदेवी यांना घेऊन त्यांनी रूप की रानी चोरोंका राजा हा चित्रपट बनवला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला तेव्हा त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. इतकंच नाही तर त्या अनवाणी सिद्धिविनायक मंदिरात देखील गेल्या होत्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याविषयी सविस्तर सांगत बोनी कपूर म्हणाले, रूप की रानी चोरों का राजा या चित्रपटासाठी त्यांनी अनेकांकडून पैसे उधारीवर घेतले होते. त्यांना आशा होती की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. मात्र, त्याच्या एकदम विरुद्ध झालं आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरली. ज्यामुळे बोनी कपूर यांना कोटींचे नुकसान झाले आणि ते कर्जात बुडाले. त्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की त्यांना त्यांचं घर देखील विकावं लागलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पहिल्या पत्नीचा उल्लेख करत बोनी कपूर म्हणाले, मोना शौरी कपूर माझ्यासोबत पूर्णवेळ उभी होती. इतकंच नाही तर मोनानं माझ्यासाठी अनवाणी सिद्धिविनायक मंदिरात गेली होती. मात्र, इतकं होऊनही बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला सोडत श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं. या गोष्टीचं दु:ख मोना आणि त्यांची मुलं सहन करू शकले नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बोनी कपूर नेहमीच म्हणायचे की त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला धोका दिला नाही. दरम्यान, मोना आणि श्रीदेवी या एकेकाळी बेस्ट फ्रेंड होत्या. काही दिवस मोना यांनी श्रीदेवीला त्यांच्या घरी देखील ठेवून घेतले होते. या दरम्यान, श्रीदेवी आणि मिथुन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी लग्न केले.