close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO : बोनी कपूर - उर्वशीचा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड आभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Updated: Apr 2, 2019, 07:15 PM IST
VIDEO : बोनी कपूर - उर्वशीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूड आभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोमवारी व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बोनी कपूर उर्वशीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे. एका वृत्तपत्रामध्ये तिने ही बातमी वाचली आणि तिचा राग अनावर झाला. त्यानंतर तिने ट्विटरच्या माध्यमातून या बातमीचे खंडन केले आहे. बातमीचे खंडन करत तिने ट्विटरवर लिहिले आहे की , 'अशा प्रकारच्या  बातमीची मला जरा सुद्धा कल्पना नव्हती. महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतात आधी त्यांचा आदर करायला शिका.' असे सडेतोड मत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले आहे. 

 

 

व्हायरल झालेला हा व्हिडीओ चित्रपट निर्माता जयंतीलाल गाडाच्या एका कार्यक्रमाच्या वेळेसचा आहे. त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्याचा हा व्हिडीओ आहे. या स्वागत सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. याच पार्टी दरम्यान उर्वशी आणि बोन कपूर भेटले होते.