‘जब धरती माँ बुलाती है…’ Border 2 चा दमदार टीझर रिलीज; अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही!

सनी देओलचा सर्वात मोठा चित्रपट 'बॉर्डर'चा सिक्वेल बनवला जात आहे. 'बॉर्डर 2' मध्ये वरुण धवन दिसणार असून आता त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सनी देओलने त्याची पहिली झलक दाखवली असून या व्हिडीओमध्ये वरुण धवनचा आवाज ऐकू येत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 23, 2024, 06:51 PM IST
‘जब धरती माँ बुलाती है…’ Border 2 चा दमदार टीझर रिलीज; अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही! title=

Border 2 : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने एक आनंदाची बातमी दिली आहे. वरुण धवन आता सनी देओलच्या  'बॉर्डर 2' चित्रपटामध्ये दिसणार आहे. सनी देओलनंतर वरुण धवनने  'बॉर्डर 2' चित्रपटामध्ये प्रवेश केला आहे. निर्मात्यांनी यासंदर्भात एक अधिकृत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये अभिनेता वरुण धवनचा दमदार संवाद ऐकू येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही क्लिप पुष्टी करते की पुन्हा एकदा  'बॉर्डर 2' हा देशातील सर्वात मोठा युद्धपट ठरणार आहे. वरुण धवनही  'बॉर्डर 2' चित्रपट करताना खूप आनंदी आहे. अभिनेत्याने देखील यासंदर्भात एक लांबलचक पोस्ट शेअर करून चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. 

शुक्रवारी  'बॉर्डर 2' च्या कलाकारांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. वरुण धवनची या चित्रपटात एन्ट्री झाली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वरुण धवनच्या आवाजात या व्हिडीओमध्ये एक डायलॉग ऐकू येत आहे. ज्यामध्ये 'जय हिंद म्हणत मी शत्रूच्या प्रत्येक गोळीला टक्कर देतो...जेव्हा पृथ्वी माता हाक मारते तेव्हा मी सर्व काही सोडून येतो. मी भारताचा सैनिक आहे'.  

बॉर्डर 2 'या' दिवशी होणार प्रदर्शित 

'बॉर्डर 2' चा हा डायलॉग सध्या चाहत्यांची उत्कंठा वाढवत आहे. 'बॉर्डर 2' हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. सनी देओलनेही वरुण धवनचे सोशल मीडियावर स्वागत करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वरुण धवनच्या पोस्टमध्ये काय? 

वरुण धवन देखील अभिनेता सनी देओलसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. त्याने पोस्टमध्ये सांगितले की, तो 4 वर्षांचा असताना चंदनसोबत 'बॉर्डर' चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट पाहिल्यानंतर तो खूप प्रभावित झाला होता. आजपर्यंत तो एकही गोष्ट विसरला नाही. त्याचा हिरो सनी पाजीसोबत काम करायला तो खूप खूश आहे. हे खूप खास असणार आहे. असं त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.