close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Box Office : मैत्रीचं अनोखं दर्शन घडवणारा 'छिछोरे' सलग चढत्या क्रमावर

महाविद्यालयीन जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या 'छिछोरे' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

Updated: Sep 18, 2019, 02:48 PM IST
Box Office : मैत्रीचं अनोखं दर्शन घडवणारा 'छिछोरे' सलग चढत्या क्रमावर

मुंबई : महाविद्यालयीन जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या 'छिछोरे' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. मित्र कशाप्रकारे एका मित्राच्या कठीण प्रसंगी त्याची साथ देतात हे दाखवणार 'छिछोरे' चित्रपट मित्रीच्या अतूट बंधावर आधारलेला आहे. ६ सप्टेंबरला रूपेरी पडद्यावर धडकलेल्या या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. एकंदर या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर भुरळ घातली आहे. 

चित्रपटाला प्रदर्शित होवून १२ दिवस झाले आहे. तरी देखील चित्रपटाच्या कमाईचा आकाडा सतत चढत्या क्रमावर आहे. ट्रेंड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांवर केंद्रित असलेला 'छिछोरे' चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. 

चित्रपटात सुशांत, श्रद्धाने प्रमुख भूमिका साकारली असून प्रतीक बब्बर सुशांतच्या मित्राची भूमिका साकारत आहे. 'छिछोरे'चं दिग्ददर्शन 'दंगल' चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडियोज आणि साजिद नाडियावाला यांनी केली आहे.