प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी 'मर्दानी २'ची दमदार कमाई

चित्रपटात राणी एका निर्भिड पोलिसाच्या भूमिकेला न्याय देताना दिसत आहे.

Updated: Dec 14, 2019, 04:53 PM IST
प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी 'मर्दानी २'ची दमदार कमाई title=

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर 'मर्दानी २' चित्रपट १३ डिसेंबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झाला. गेल्या काही दिवसांपासून राणी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होती. तिच्या या मेहनतीला आता चांगली दाद मिळत असल्याचं बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारा भोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे आणि त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहे. 

‘मर्दानी 2’ या चित्रपटात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचा आकडा जाहीर केला. 'मर्दानी २' प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी ३.८० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. 

याआधी प्रदर्शित झालेल्या राणीच्या 'हिचकी' चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.३२ कोटींचा गल्ला जमा केला होत. शिवाय 'मर्दानी' चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.४६ रूपयांपर्यंत मजल मारली होती. तर आता 'मर्दानी २' चित्रपटाने राणीच्या या दोन्ही चित्रपटांना मागे टाकलं आहे. 

चित्रपटात राणी एका निर्भिड पोलिसाच्या भूमिकेला न्याय देताना दिसत आहे. 'यशराज फिल्म'च्या बॅनर खाली साकारण्यात येत असलेल्या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांची आहे.