बोल्ड इमेजची चौकट मोडत नोराचा नवा तोरा

नोरा फतेही अनेकदा रिव्हीलिंग ड्रेस परिधान करताना दिसते.

Updated: Jan 26, 2022, 06:37 PM IST
बोल्ड इमेजची चौकट मोडत नोराचा नवा तोरा title=

मुंबई : नोरा फतेही अनेकदा रिव्हीलिंग ड्रेस परिधान करताना दिसते. सोशल मीडियावरही ती एकापेक्षा एक पोझ देत फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये अनेकदा तिची बोल्ड स्टाईल पाहायला मिळते. पण 26 जानेवारीच्या निमित्ताने अभिनेत्रीने असा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आधीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहे.

सिंपल लूकमध्ये दिसते खूप सुंदर
सगळ्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत नोरा फतेहीने अतिशय सुंदर भारतीय पोशाख परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या साध्या लूकमध्ये अभिनेत्री इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणं कठीण होईल.

सलवार सूट लूक झाला व्हायरल
या ताज्या फोटोंमध्ये नोरा फतेही सलवार सूट परिधान करताना दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीने क्रीम रंगाचा सूट घातला आहे. तिच्या डोक्यावर तिने ओढणी घेतली आहे आणि अतिशय हलका मेकअप केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोराचा हा साधा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहते सतत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काहीजण हार्ट इमोजी शेअर करत आहेत तर काही फोटोंवर कमेंट करत आहेत.