मुंबई : 'मुल्क', 'आरक्षण' आणि 'बागी 2' सारख्या सिनेमांमध्ये दिसणारा अभिनेता प्रतीक बब्बरवर गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सगळीकडे #MeToo ची चळवळ सुरू असताना या संबंधी नाना पाटेकरांसह चार जणावर गुन्हा दाखल झालेला असताना आता प्रतिक बब्बरवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं कसलं यावर जोरदार चर्चा रंगली आहे.
गोव्यात पोलिसांनी प्रतीक बब्बरवर आपल्या कारने स्कूटरला टक्कर मारली. या प्रकरणी गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांगितलं जातंय की, गोवा पोलिसांनी प्रतीक बब्बर विरोधात निष्काळजीपणात गाडी चालवल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी झाली असून 21 वर्षाचा एक स्थानीक युवर आपल्या बहिणीला स्कूटरवर घेऊन जात असताना प्रतीक बब्बरच्या कारने टक्कर मारली.
Goa: Bollywood actor Prateik Babbar has refused to take a medical test after being booked under the Motor Vehicles Act for knocking down a motorcycle driver, after entering a one-way street. Police would be interrogating him tomorrow pic.twitter.com/oekw0sAomA
— ANI (@ANI) October 10, 2018
असं सांगितलं जातं की, प्रतीक बब्बर त्या मुलाला धमकी देखील देत होते. यानंतर त्या युवकाने पोर्वोरिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रतीक बब्बर वन वे रोडवर गाडी चालवत असल्यामुळे टक्कर झाली.