close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चोप्रा सिस्टर्स लवकरच झळकणार एकत्र

 दोन बहिणींची कथा चोप्रा सिस्टर्स चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहेत. 

Updated: Oct 18, 2019, 06:54 PM IST
चोप्रा सिस्टर्स लवकरच झळकणार एकत्र

मुंबई : बॉलिवूडच्या चोप्रा सिस्टर्स म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणिती चोप्रा लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. बॉलिवूड ते हॉलिवूड पर्यंत नाव कमणाऱ्या प्रियांच्या पावलावर पाऊल ठेवत परिणिती आणि देसी गर्ल हॉलिवूडमध्ये एकत्र काम करणार आहेत. प्रियांका आणि परिणिती लवकरच हॉलिवूडच्या 'फ्रोझेन २' चित्रपटाला आपला आवाज देणार आहेत. 

ऍनिमेशनच्या जगात साकारण्यात येणाऱ्या दोन बहिणींची कथा चोप्रा सिस्टर्स चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहेत. दोघींनी देखील सोशल मीडियीच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. चित्रपटात एनाच्या भूमिकेला परिणिती तर एल्साच्या भूमिकेला प्रियांका आवाज देणार आहे. 

'फ्रोझेन २' चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी रूपेरी पडदयावर दाखल होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन  Jennifer Lee आणि Chris Buck यांनी केले आहे.