CID फेम अभिनेत्रीचा बाथरुम फोटो लीक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Jul 28, 2022, 11:45 AM IST
CID फेम अभिनेत्रीचा बाथरुम फोटो लीक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : आजही लोक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध डिटेक्टिव्ह शो 'सीआयडी'ला विसरलेले नाहीत. या शोमुळे प्रेक्षकांनी दीर्घकाळ थ्रिलर आणि सस्पेन्सचा आनंद लुटला आहे. या शोमधला प्रत्येक कलाकार आजही प्रेक्षकांना खूप आवडतो. या शोमधील एसीपी प्रद्युम्नपासून दयापर्यंत कोणालाही प्रेक्षक विसरू शकत नाही. त्याच वेळी, शोमध्ये एक कलाकार होती जी आज तिच्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी ओळखली जाते. या अभिनेत्रीचं नाव मेघा गुप्ता आहे. मेघा गुप्तानं 'सीआयडी' मध्ये इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. मेघा नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. दरम्यान, मेघाच्या एका फोटोने सर्वांनाच धक्का दिला आहे. मेघाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

'CID' मधील इन्स्पेक्टर मेघा गुप्ताने इन्स्टाग्रामवर स्वतःचा हा फोटो शेअर केला आहे. मेघाचा हा फोटो बाथरुममधला आहे. या फोटोत मेघा बाथटबमध्ये असून तिच्यासोबत तिचा श्वानही दिसत आहे. तर या वेळी मेघानं तिची ब्रा काढून हवेत धरली आहे. या फोटोत मेघा खूपच बोल्ड दिसत आहे. 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मेघा गुप्ताने 'कुमकुम', 'ममता', 'आहट', 'ड्रीम गर्ल' आणि 'आयुष्मान भव' यासह अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय तिनं 'सीआयडी'मध्येही काम केले आहे. या शोमध्ये तिनं इन्स्पेक्टर मेघा गुप्ताची भूमिका साकारली होती. मेघाची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. मेघा गुप्ता 'सावधान इंडिया', 'कोड रेड' आणि 'एमटीव्ही बिग एफ' मध्ये देखील दिसली आहे. सोशल मीडियावर मेघा गुप्ताचे लाखो चाहते आहेत. मेघा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.