कोरोना नियम मोडल्यानं सोहेल, अरबाज खानवर तक्रार दाखल

25 तारखेला हे तिघेजण युएई हून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते.    

Updated: Jan 4, 2021, 09:34 PM IST
कोरोना नियम मोडल्यानं सोहेल, अरबाज खानवर तक्रार दाखल title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. एअरपोर्टवरुन नियमांचा भंग करुन पळून गेल्या प्रकरणी खार पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाकल करण्यात आली आहे. नियमानुसार युएई वरुन आल्यानंतर त्यांना ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे आवश्यक होते. मात्र कोरोना नियमांचं पालन न केल्यामुळे त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

दरम्यान, 25 तारखेला हे तिघेजण युएई हून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. आपली बुकींग ताज लॅन्ड्स मध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र ते तिघे परस्पर घरी गेल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे खार पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

कोरोना नियमांचा भंग केल्यानंतर फाईव्ह स्टार हॉटेलला क्वारंटाईन व्यवस्था न करता भायखळ्याच्या रिचर्डसन अॅन्ड क्रुजास मध्ये या तिघांना ठेवलं जाईल असं सांगण्यात येत आहे. अभिनेता सोहेल खानच्या पत्नीवर देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पोलिसांकडून या तिघांना रात्री ताब्यात घेतलं जाऊ शकतं. तिघांना भायखळ्याच्या रिचर्डसन अॅन्ड क्रुडास येथील क्वारंटाईन सेंटरला नेण्याची शक्यता आहे. शिवाय येत्या ९ तारखेपर्यंत त्यांना तिथे ठेवण्यात येईल.