या कंडोम ब्रँडकडून दीपिका - रणवीरला खास शुभेच्छा

अमूलनंतर यांनी दिल्या शुभेच्छा 

या कंडोम ब्रँडकडून दीपिका - रणवीरला खास शुभेच्छा

मुंबई : इटलीतील लेक कोमोमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका - रणवीर यांचा विवाह सोहळा पार पडला. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातल्या आणि सगळीकडूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. बॉलिवूडकरांकडून शुभेच्छा मिळाल्यानंतर लोकप्रिय ब्रँड यांनी देखील दीपवीरला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अमूल, कंडोम ब्रँड ड्युरेक्स यांचा देखील समावेश आहे. 

नुकतंच लग्न झालेल्या या बी टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्याला यांनी देखील अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. ही जाहिरात ब्रँडच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "We've got you covered."

आपल्याला माहितच आहे, रणवीर सिंह हा ड्युरेक्स या कंडोम कंपनीचा ब्रँड अॅम्बासिडर आहे. तसेच रणवीर हा पहिला बॉलिवूड अभिनेता आहे ज्याने या कंपनीच्या जाहिराती केल्या आहेत. 

14 नोव्हेंबर रोजी दीपवीरने इटलीतील लेक कोमोमध्ये संध्याकाळी 7 च्या सुमारास कोकणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर आज म्हणजे 15 नोव्हेंबरला हे दोघं सिंधी पद्धतीने लग्न करणार आहेत. यानंतर ही जोडी भारतात परतणार आहेत. आणि त्यानंतर 3 मोठे ग्रँड रिसेप्शन होणार आहे. 21 नोव्हेंबरला बंगलुरूमध्ये आणि त्यानंतर 28 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला मुंबईतील ग्रँड हयातमध्ये दोन रिसेप्शन पार पडणार आहे.