Salman Khan: तब्बल 23 वर्षांची खुन्नस! बॉलिवूडच्या 'खलनायक'नं जेव्हा सलमानला त्याची जागा दाखवली...

Salman Khan : सलमानच्या सोबत मात्र असाच एक प्रसंग घडला होता ज्यामुळे बॉलिवूडच्या एका दिग्गज खलनायकानं चक्क सलमानसोबत गेली 23 वर्षे रोष धरला होता.

Updated: Jan 18, 2023, 04:21 PM IST
Salman Khan: तब्बल 23 वर्षांची खुन्नस! बॉलिवूडच्या 'खलनायक'नं जेव्हा सलमानला त्याची जागा दाखवली... title=

Salman Khan: सलमान खान हा आजच्या घडीचा एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याचबरोबर सलमान खानचं फॅन फॉलोईंगही (Salman Khan Fan Following) खूपच जास्त आहे. आपल्यालाही असंच वाटतं असेल की, सलमान खान इतके वर्ष या क्षेत्रात असल्यानं त्याचे सगळ्यांशीच संबंध चांगले असतील परंतु सलमानच्या सोबत मात्र असाच एक प्रसंग घडला होता ज्यामुळे बॉलिवूडच्या एका दिग्गज खलनायकानं चक्क सलमानसोबत गेली 23 वर्षे रोष धरला होता. सलमान खानच्या त्या एका चुकीमुळे या दिग्गज कलाकाराशी मात्र त्याला आपलं नातं तोडावं लागलं आहे आणि चक्क हा दूरावा 23 वर्षे तरी राहिला होता. (danny denzongpa was not working with salman khan for almost 23 years see what is the reason)

या अभिनेत्याचे नावं आहे डॅनी डिन्जोप्पा (danny denzongpa). या दिग्गज अभिनेत्यानं मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक नामवंत चित्रपटांतून खलनायकाच्या भुमिका केल्या आहेत. यंदाही त्यांचा अमिताभ बच्चन यांच्यासमवेत उच्चाई (Unchaai) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला आणि त्यांच्या भुमिकेलाही खूप चांगल्या प्रतिक्रियाही मिळाली आहे. परंतु सलमान खान आणि डॅनी डिन्जोप्पा (danny denzongpa) यांच्यातले संबंधही खूप काळ खराब होते. परंतु आता त्यांच्यात काहीसं हवेदावे नाहीत, असे कळते आहे. 

परंतु नक्की त्यांच्यात असे झाले होते तरी काय की तब्बल 23 वर्षे डॅनी डिन्जोप्पा यांनी सलमान खानसोबत काम करण्याचे ठरविले होते. सलमान खान (Salmaan Khan) या क्षेत्रात येण्यापुर्वी डॅनी डिन्जोप्पा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खूप मोठे आणि दिग्गज कलाकार होते. त्यानंतर या दोघांनी 'सनम बेफवा' (1991) (Sanam Befawa) या चित्रपटातून पहिल्यांदा एकत्र काम केले होते. परंतु या चित्रपटाच्या वेळी असा एक प्रसंग घडला होता जेव्हा डॅनी डिन्जोप्पा हे सलमान खानवर प्रचंड चिडले होते.

हेही वाचा - Air India जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर...500 विमानांची खरेदी करणार?

सलमानची 'ती' वाईट सवय आणि... 

या चित्रपटाच्या वेळी सलमान खान हा सेटवर खूप उशिरा येयचा त्यातून त्याला डॅनी डिन्जोप्पा यांनी मात्र त्यामुळे सलमान खानवर खूप राग ठेवला होता. डॅनी डिन्जोप्पा यांनी यापुढे सलमान खानसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर यापुढे अनेकदा डॅनी डिन्जोप्पा यांना सलमान खानसोबत काम करण्यासाठी अनेकदा विचारणा झाली होती तेव्हा मात्र डॅनी डिन्जोप्पा (danny denzongpa) यांनी स्वत:हूनच त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून जवळपास 23 वर्ष डॅनी डिन्जोप्पा यांनी सलमान खानसोबत काम केले नव्हते. परंतु शेवटी त्यांनी 2014 साली आलेल्या 'जय हो' (Jai Ho) या चित्रपटातून समोर आले होते.