बॉलिवूड अभिनेत्यांना टक्कर देतोय कतरिनाचा बॉडीगार्ड

सलमान खानला देखील टाकलं मागे 

Updated: Nov 12, 2019, 03:20 PM IST
बॉलिवूड अभिनेत्यांना टक्कर देतोय कतरिनाचा बॉडीगार्ड

मुंबई : भारतात सिनेकलाकारांबद्दल इतकं प्रेम आहे की, कधी ते आपली सीमा पार करतात. अशावेळी ते त्यांच्याच आवडीच्या कलाकाराला संकटात टाकतात. अशावेळी त्यांना या संकटातून वाचवण्यासाठी बॉलिवूड कलाकार आपल्यासोबत बॉडीगार्ड ठेवतात. बॉडीगार्ड अगदी सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असतात. 

कलाकार आणि बॉडीगार्डबद्दल बोलायचं झालं तर सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा हा अतिशय लोकप्रिय आहे. शेराने नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. सलमानसोबत बॉडीगार्ड सिनेमातही शेरा दिसला होता. एक असा बॉडीगार्ड आहे ज्याने अनेक सिनेमांच्या ऑफर्स नामाकरून फक्त आपल्या कामाशी इमान राखलं. तो बॉडीगार्ड आहे दीपक कुलभूषण. 

दीपक कुलभूषण हा अभिनेत्री कतरिना कैफचा बॉडीगार्ड आहे. दीपकचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतं पण तो बॉडीगार्ड झाला. दीपक अनेक वर्षांपासून कतरिनाचे बॉडीगार्ड आहेत. दीपक कतरिनाच्या अगोदर अभिनेता शाहरूख खान आणि इतर कलाकारांचा अंगरक्षक राहिला आहे. 

एवढंच नव्हे तर दीपक सचिन तेंडुलकर यांचा देखील अंगरक्षक राहिलेला आहे. दीपक धक धक गर्ल माधुरीकरता अनेकदा कामावर थांबला आहे. दीपकची पर्सनॅलिटी ही अभिनेत्यापेक्षा कमी नाही. अनेकदा त्याला सिनेमांच्या ऑफर्स देखील आल्या आहेत. मात्र, तो जे काम करतो त्यातून त्याला आनंद मिळतो. त्याला फिल्मस्टार नाही व्हायचं. 

दीपक डोम सिक्युरिटी नावाने स्वतःची सिक्युरिटी सर्विस सेवा पुरवतो. दीपकचे वडिल हे भारतीय सेनेत होते. त्याला लहानपणापासून क्रिकेटर व्हायचं होतं पण ते शक्य झालं नाही. दीपकचं लग्न झालं आहे. अनेकदा तो सोशल मीडियावर आपले पत्नीसह फोटो शेअर करत असतो. दीपकला एक गोंडस मुलगी देखील आहे.