दीपिका-रणवीरचा सिक्रेट व्हिडिओ व्हायरल...

दीपवीरचे सिक्रेट हॉलिडेज...

Updated: Aug 2, 2018, 08:09 AM IST
दीपिका-रणवीरचा सिक्रेट व्हिडिओ व्हायरल...

मुंबई : सध्या बॉलिवूड वर्तुळात प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. तर एकीकडे अजून एक बॉलिवूड कपल विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. बॉलिवूडमधील चार्मिंग कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. सध्या दोघेही सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.

दीपिका आणि रणवीर याच वर्षी नोव्हेंबरमध्ये विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे. सुत्रांनुसार, यांचे कुटुंबियही लग्नाची जोरदार तयारी करत आहेत. पण तरीही देखील या दोघांनी लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही.
दीपवीरच्या लग्नाची चर्चा असताना या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोघेही फिरताना दिसत आहे. व्हिडिओत दीपिका रणवीरचा हात पडकताना दिसत आहे.

पाहा या दोघांच्या सिक्रेट हॉलिडेचा व्हिडिओ...

 

Another one  @deepikapadukone  #deepikapadukone

A post shared by deepikapadukone (@deepikapadukone_slay) on

हा व्हिडिओ नक्की कुठला आहे, हे अजूनही कळलेले नाही. यात दीपिका-रणवीर कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. व्हिडिओत रणवीरला ओळखणेही कठीण होत आहे. 
दीपवीर डेस्टिनेशन वेडींग करणार असून इटलीतील लेक कोमो, लोम्बार्डी येथे लग्न होणार असल्याची चर्चा आहे. हे इटलीतील प्रसिद्ध टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. या लग्नात दोघांचे कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार सहभागी होईल.