असं काही झालच नव्हतं, दीपिका विषयी अफवा पसरवण्याआधी वाचा ही बातमी

दीपिकाला रुग्णालयात दाखल केल्याचं कळताचं चाहत्यांना चिंता, जे घडलं ते ऐकल्यावर धक्काच बसेल  

Updated: Jun 15, 2022, 01:27 PM IST
असं काही झालच नव्हतं, दीपिका विषयी अफवा पसरवण्याआधी वाचा ही बातमी title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या यशाचा डंका बाजवणारी अभिनेत्री दीपिका पुन्हा चर्चेत आली आहे, ते म्हणजे तिच्या प्रकृतीमुळे. मंगळवारी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली. पण या फक्त अफवा असून दीपिकाची प्रकृती उत्तम आहे. दीपिकाची प्रकृती स्थिर आहे, असं कळताचं चाहत्यांची देखील चिंता मिटली आहे. .

दीपिकाची प्रकृती स्थिर आहे आणि अभिनेत्री सध्या हैदराबादमध्ये नाग अश्विनच्या 'के'साठी शूटिंग करत आहे. 'के' सिनेमातून दीपिका अभिनेता प्रभाससोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

आगामी सिनेमासाठी दीपिका प्रचंड उत्सुक आहे. ती म्हणाली, 'मी याआधी प्रभाससोबत काम केलेलं नाही. नागासोबत देखील काम केलेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे सिनेमा वेगळ्या भाषेत असल्यामुळे मी अधिक उत्सुक असल्याचं देखील दीपिकाने सांगितलं आहे. 

'के' सिनेमाशिवाय दीपिकाने अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दीपिका अभिनेता शाहरुख खानसोबत 'पठान' सिनेमात दिसणार आहे. याआधी देखील दीपिकाने शाहरुखसोबत स्क्रिन शेअर केली आहे. 

शाहरुख आणि दीपिकाच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. त्यामुळे 'पठान' सिनेमातील त्यांची जोडी कोणत्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.