Deepika Padukone रणवीरच्या जाचाला कंटाळली? नवरोबासाठी खास पोस्ट करत सांगितली खोड!

Deepika Padukone Marrried Life: आता दीपिका पादुकोनची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय आहे. दीपिका रणवीरच्या (Ranveer Singh) जाचाला कंटाळली का? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.

Updated: Aug 14, 2023, 12:51 PM IST
Deepika Padukone रणवीरच्या जाचाला कंटाळली? नवरोबासाठी खास पोस्ट करत सांगितली खोड!  title=
Deepika Padukone Post For Ranveer Singh

Deepika Padukone Post For Ranveer Singh: रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण म्हणजे बॉलिवूडचे हॉट कपल. रणवीर सिंह याचा ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर त्याच्या या चित्रपटाने दमदार कमाई केली. त्यामुळे रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता दीपिका पादुकोनची (Deepika Padukone Post) एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय आहे. दीपिका रणवीरच्या जाचाला कंटाळली का? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.

दीपिका पदुकोणने रविवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये तिने दोन लोकांचे वैवाहिक जीवन (Deepika Padukone Marrried Life) दर्शविणारी एक मजेदार रील शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पत्नीला साफसफाईचे किंवा इतर काही कामाचं वेड असल्यामुळं तिला थोडा वेळही आराम मिळत नाही. मात्र, तिचा नवरा सतत लॅपटॉपवर काहीतरी ना काही पाहत असतो. दीपिकाने या रीलची तुलना रियर लाईफशी करत रणवीरची पोलखोल केली आहे.

दीपिकाने इंस्टाग्राम स्टोरीवर (Instaragram Reel) रील शेअर केला अन् मी आणि माझा नवरा, असं कॅप्शन द्याला दिलं. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यावेळी तिने रणवीरला देखील टॅग केलंय. जेव्हा तुम्ही आराम करू शकत नसलेल्या व्यक्तीशी लग्न करता, असा टोमणा या व्हिडीओमधून लगावण्यात आला आहे.

पाहा Video

रॉकी और राणी की प्रेम कहाणी सिनेमा (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) यंदाच्या वर्षातील 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होणारा सहावा हिंदी सिनेमा ठरला आहे. आता सुद्धा या सिनेमाची क्रेझ असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता सिनेमा ओटीटीवर कधी येणार? याची काहीजण वाट पाहत आहेत. 

दरम्यान, आम्हाला घरी चित्रपट पाहणे आणि बाहेरून जेवण ऑर्डर करून एकमेकांबरोबर वेळ घालवणे जास्त आवडतं. मला रेस्टॉरंटमध्ये जायला अजिबात आवडत नाही, यापेक्षा आम्ही आमच्या घरात एकत्र वेळ घालवतो. जेव्हा कामाला सुट्ट्या असतात किंवा फारशी कामे नसतात तेव्हा आम्ही सोबत असतो, असं दीपिका म्हणाली होती.