मुंबई : बॉलिवूडमध्ये आता आणखी एका जोडीची चर्चा होतेय आणि ती म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. हे दोघे आता लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. या चर्चेमुळे दीपिका पदुकोणाचे चाहते नाराज झाले आहेतच. पण आता आलेली माहिती त्यांना नक्कीच नाराज करणार आहे. कारण आता यापुढे दीपिका पदुकोण त्यांना बॉलिवूडमध्ये दिसणार नाही.
चर्चा खरी मानाल तर दोघांच्याही पालकांनी या लग्नाची तारीख निश्चित केली आहे. या लग्नाची तयारीही सुरू झाल्याची खबर आहे. यातच एक आणखी नवी खबर आहे. होय, लग्नानंतर दीपिका अभिनय सोडून आपल्या कौटुंबिक आयुष्यात बिझी होऊ शकते. दीपिकाला म्हणे, लग्नानंतर खूप सारी मुलं हवी आहेत. खुद्द दीपिकाने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. लग्नानंतर कदाचित मी अॅक्टिंग सोडून फॅमिली लाईफमध्ये बिझी होऊ शकते. माझ्यासाठी कुटुंबापेक्षा मोठे काहीही नाही. मला खूप सारी मुलं हवी आहेत.
मला कुटुंबाचे महत्त्व ठाऊक आहे. कुटुंब तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देते, असे दीपिका या मुलाखतीत म्हणाली. अर्थात लग्नाचा प्लान कधी आहे? हा प्रश्न मात्र दीपिकाने चतुराईने टाळला. मला माहित नाही, मी लग्न कधी करेल. सध्या तरी अशी कुठलीही योजना नाही,असे दीपिका म्हणाली.
दीपिका व रणवीर या दोघांनी लग्नासाठी यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यातील चार तारखा निश्चित केल्या आहेत. यापैकी एक तारीख अंतिमत: निश्चित करण्यात येईल. दीपिका व रणवीरचे लग्न एक खासगी सोहळा असेल. केवळ कुटुंबातील व्यक्ती आणि अतिशय जवळचे मित्र व नातेवाईक एवढेच या लग्नात असतील.