मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांचे कुटुंबियही लग्नाच्या तयारीला लागले आहे. काही दिवसांपूर्वीच यांचे लग्न मुंबईतील 5 स्टार हॉटेलमध्ये होणार असल्याची खबर आली होती. मात्र मीडिया रिपोटनुसार आता दोघांच्याही लग्नाची तारीख ठरली आहे. दोन्ही परिवारांनी मिळून ही तारीख ठरवली असल्याचे कळते आहे.
या विवाहसोहळ्यासाठी सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील 4 तारखा ठरवण्यात आल्या आहेत. मात्र यावर दीपिका-रणवीरने शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. अलिकडेच दोघेही मालदीवजला व्हेकेशनसाठी गेले होते. त्यानंतरच या दोन्ही परिवाराने एकमेकांची भेट घेतली. तारखेसोबतच लग्नाचे ठिकाणही फायनल करण्यात आले आहे. विवाहसोहळ्यात नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळीच उपस्थित राहतील.
काही दिवसांपूर्वीच दीपिकाला आई आणि बहिणीसोबत ज्वेलरी शॉपिंग करताना स्पॉट करण्यात आले होते.
खरंतर दीपिका-रणवीरला डेस्टिनेशन वेडिंग करायचे होते. मात्र कुटुंबियांना लग्न मुंबईतच करायचे होते. कारण रणवीरचे अनेक नातेवाईक मुंबईतच राहतात आणि सर्वांना रणवीरच्या लग्नाला उपस्थित राहता यावे, यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आल्याचे कळतेय. लग्नानंतर ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन करण्याचा विचार सध्या सुरू आहे.