अभिनेता दिलीप कुमार यांनी का लपवलं आपल्या वडिलांपासून नाव?

दिलीप कुमार यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे सर्वात मोठे इन्फ्लूएंसर मानलं जातं.

Updated: May 14, 2021, 12:52 PM IST
अभिनेता दिलीप कुमार यांनी का लपवलं आपल्या वडिलांपासून नाव?

मुंबई : दिलीप कुमार यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे सर्वात मोठे इन्फ्लूएंसर मानलं जातं. त्यांना बर्‍याच नावांनीही ओळखलं जातं. कोणी त्यांना भारताचा मेथड अॅक्टर म्हणून ओळखत तर कोणी ट्रॅजिडी किंग म्हणून ओळखतं. दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान होतं. एखाद्या अभिनेत्याच्या सांगण्यानुसार, त्यांचं नाव चित्रपटसृष्टीतील एका निर्मात्यांनी बदललं होतं, त्यानंतर लोक त्यांना पडद्यावर दिलीप कुमार या नावाने ओळखू लागले.

दिलीपकुमार यांचा 'ज्वार भाटा' या चित्रपटाचे निर्माते देविका राणी यांनी त्यांना हे नाव दिलं. दिलीप यांनी 'दिलीप कुमारः द द सब्सटेंड एंड द शॅडो' या पुस्तकाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, ते मोहम्मद युसुफ खानचे दिलीप कुमार कसे बनले.

दिलीप कुमार यांच्याकडून किस्सा शेअर
दिलीप कुमार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, "देविका राणी यांनी मला सांगितलं की, युसुफ, मी तुला अभिनेता म्हणून लाँन्च करण्याचा विचार करत आहे. पण मला असं वाटतं की, मोठ्या पडद्यावर येण्याआधी आपलं नाव बदलाव लागेल. आपल्याला प्रेक्षकांशी जोडणारं नाव तुम्हाला द्यावं लागेल.

जेव्हा आपण एक रोमँटिक हिरोचा रोल साकारता. तेव्हा लोकांच्या मनात एक रोमँन्टिक फिलींग तयार झाली पाहिजे. त्यामुळे सर्वात आधी नावांत बदल केला गेला पाहिजे. मला वाटतं दिलीप कुमार हे एक चांगलं नाव आहे. जेव्हा मी तुमच्यासाठी योग्य नावाचा विचार करत होतो तेव्हा माझ्या मनात हे नावं सगळ्यात आधी आलं. तुम्हाला हे नाव कसं वाटलं?''

म्हणूनच दिलीप कुमार यांनी निवडलं एक्टिंग करिअर
दिलीप कुमार म्हणाले की, मी अभिनय क्षेत्राची निवड यासाठी केली. कारण, मला या क्षेत्रात बाकिच्या क्षेत्रांपैकी चार पट जास्त पगार मिळायचा आणि या पगारावर मी खूप आकर्षित झालो होतो. माझे वडील अभिनयाला 'नौटंकी' म्हणायचे. अशा परिस्थितीत माझं नाव पडद्यावर बदलणं मलाही ठीक आहे असं वाटलं. मात्र मी वडिलांना याबद्दल सांगितलं नाही, कारण मला ते मारतील याची भीती वाटत होती.