इस्लाम स्वीकारल्यामुळं चर्चेत आलेल्या दीपिकामागोमाग तिच्या पतीच्या Attitude वर संतापले चाहते

(Insta reels) रील्स असो किंवा युट्यूब व्हिडीओ (You tube video), सगळीकडे एकच चेहरा सातत्यानं दिसला तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दिपिका आणि तिच्या पतीचा. 

Updated: Dec 2, 2022, 10:25 AM IST
इस्लाम स्वीकारल्यामुळं चर्चेत आलेल्या दीपिकामागोमाग तिच्या पतीच्या Attitude वर संतापले चाहते
dipika kakar husband television actor shoaib ibrahim grab attention with attitude saba wedding

Shoaib Ibrahim Dipika Kakkar : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) एकाच नावाची चर्चा सुरु आहे. (Insta reels) रील्स असो किंवा युट्यूब व्हिडीओ (You tube video), सगळीकडे एकच चेहरा सातत्यानं दिसला तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दिपिका आणि तिच्या पतीचा. दिपिकाच्या (saba ibrahim wedding) नणंदेचं लग्न, त्यासाठीची संपूर्ण तयारी आणि बरंच काही चाहत्यांना पाहता आलं. पण, आता मात्र हीच दिपिका आणि तिचा पती भलत्याच कारणामुळं चर्चेत आले आहेत. (dipika kakar husband television actor shoaib ibrahim grab attention with attitude)

टेलिव्हीजन विश्वातील एक लोकप्रिय जोडी असणाऱ्या दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्याविषयी आपण सध्या बोलत आहोत. काही दिवसांपूर्वीच दिपिकाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. जिथं ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. चालत चालत ती पापराझीकडे येतानाच अडखळली आणि पडता पडता वाचली. तिला सावरण्यासाठी तितक्यातच एका व्यक्तीनं धाव घेतली. पण, दीपिकानं भलत्यात आवेगात त्याला दूर राहायला सांगितलं. तिची यावरून जोरदार खिल्ली उडवली गेली. (Dipika kakkar viral video)

चाहत्यांना दिसतंय या दोघांचं दुसरं रुप

एरव्ही ज्या जोडीवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात आज त्याच जोडीबद्दल त्यांच्या मनात नाराजी आहे. याचं कारण ठरत आहे दिपिका आणि शोएबचा बदलणारा स्वभाव. ज्यावेळी दीपिकाची व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून खिल्ली उडवली जाऊ लागली त्यावेळी तिनं आणि शोएबनं एकाएकी नेटकऱ्यांवर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या. 

काय आहे दिपिकाच्या पतीचं म्हणणं? 

व्हायरल व्हिडीओबाबत व्यक्त होताना लोकांनी तेच पाहिलं जे त्यांना दिसलं, पण त्यांना प्रत्यक्ष घटनेची माहितीच नाही असं तो म्हणाला. 'आम्हाला फरक पडत नाही. आम्ही पापराझींना फोटो काढण्यासाठी बोलवत नाही', असं म्हणताना तो पुढं असंकाही म्हणाला की ऐकणाऱ्यांनाही धक्काच बसला. आपल्यामुळेच या लोकंचं घर आणि चॅनल सुरु असल्याचं तो म्हणाला. त्याचा हा Attitude अनेकांनाच पटला नाही. 

हेसुद्धा वाचा : दिपिकानं स्वीकारला इस्लाम; संतप्त प्रतिक्रिया थांबता थांबेना

 

दीपिका आणि शोएबच्या या वागण्याचा अनेकांनाच अंदाज आला नाही. कोणी त्यांच्या या भूमिकेबद्दल त्यांना पाठिंबा दिला, तर कोणी त्यांना धारेवर धरलं. आपण मात्र आहोत तसेच राहू, असं म्हणत या जोडीनं स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे.