Video Viral : लेकिच्या हळदीला अक्षया देवधरचे बाबा भावूक; अश्रू थांबता थांबेना

Akshaya Deodhar Hardeek Joshi wedding :  चढली तोरणं मांडव दारी... अक्षया देवधरला हळद लागताच कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Updated: Dec 2, 2022, 09:29 AM IST
Video Viral : लेकिच्या हळदीला अक्षया देवधरचे बाबा भावूक; अश्रू थांबता थांबेना title=
marathi couple hardeek joshis bride akshaya deodhars father gets emotional oh her haldi video viral

Akshaya Deodhar Hardeek Joshi wedding : छोट्या पडद्यावरील गाजलेली जोडी, म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी काही क्षणांतच लग्नबंधनात अडकणार आहे. 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhayt jeev rangala) या मालिकेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास पाहताना ही जोडी प्रेक्षकांच्या मनातच घर करुन गेली. खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांना शोभतील असं नकळत म्हणणाऱ्यांची इच्छा आता खरंच फळणार आहे. कारण, आता अक्षया देवधर खऱ्या आयुष्यात हार्दिकची पत्नी होणार आहे. 

काही दिवसांपासूनच त्यांच्या लग्नाची लगबग सुरु होती आणि अखेर लग्नविधींना सुरुवात झाली. या दोघांचाही हळदी समारंभसुद्धा नुकताच पार पडला. यावेळी मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी या जोडीच्या जीवनातील खास क्षणांना चार चाँद लावले. पण, संपूर्ण माहोलच तेव्हा भावुक झाला ज्यावेळी अक्षयाचे वडील एखादं लहान मूल रडतं, तसे रडू लागले. (marathi couple hardeek joshis bride akshaya deodhars father gets emotional oh her haldi video viral )

सर्वकाही ठिक होतं आणि अचानक... 

अंगाखांद्यावर खेळलेली लेक एक दिवस दुसऱ्याच्या घरी निघून जाणार या विचारानं कोणत्याही वडिलांच्या मनात भावनांचा काहूर माजतो. नेहमी धीरगंभीर दिसणारा कुटुंबप्रमुख लेकिच्या पाठवणीच्या विचारानं कोलमडून जातो. अक्षयाच्या बाबांसोबतची तेच झालं. (Akshaya deodhar father emotional video) 

 

हेसुद्धा वाचा : रस्त्यावर चाट खाण्यापासून Hair Cut पर्यंत, Amitabh Bachchan यांच्या नातीचा साधेपणा पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक

लेकिच्या हळदीच्याच दिवशी त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेल्या सर्व भावना अखेर अश्रूंवाटे व्यक्त झाल्या आणि हे क्षण पाहताना अनेकांचेत डोळे पाणावले. काहीतरी खूप खास आपल्यापासून दुरवलं जातंय, आपली लेक दुसऱ्याची होतेय या सर्व भावना त्यांचा चेहरा आणि अश्रू व्यक्त करुन गेले. सोशल मीडियावर यासंबंधीचाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जिथे अक्षया आपल्या लाडक्या बाबांना सांभाळताना दिसत आहे. त्यांचे अश्रू पुसताना दिसत आहे. पण, शेवटी बाबाच ते. मन घट्ट करुनही किती करणार? नाही का... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by fillamwala (@fillamwala)

हळदीला एकच कल्ला (Akshaya deodhar hardeek joshi haldi )

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या हळदी सोहळ्याच्या वेळी कुठे भावना ओसंडून वाहताना दिसल्या तर कुठे उत्साहाला आणि आनंदाला उधाण आलेलं दिसलं. या दोघांच्याही मित्रपरिवारानं हळदी समारंभात एकच कल्ला केला. खुद्द नवरा- नवरीनंही या क्षणांचा मनमुराद आनंद घेतल्याचं यावेळी पाहायला मिळालं.