मुंबई : आमिर खान अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. दरवर्षी आमिर एक चित्रपट घेऊन येतो जो वर्षानुवर्षे लोकांच्या लक्षात राहतो. या अभिनेत्याने आपल्या आयुष्यातील 30 वर्षे मनोरंजन जगताला दिली आहेत.
आज तो चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा भाग बनला आहे, पण कधी-कधी तो अशा टप्प्यातूनही गेला आहे, जेव्हा त्याला स्वत:च्या चित्रपटांची पोस्टर रिक्षावर चिकटवली आहेत.
आमिर खान हे एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे पण सुरुवातीच्या काळात त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. अगदी लहान कलाकार म्हणूनही त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यावेळी आमिर खानला फार कमी लोक ओळखत होते आणि तेव्हा सोशल मीडियासारखे माध्यम अस्तित्वात नव्हते.
तो रस्त्यावर फिरायचा आणि रिक्षांवर त्याच्या चित्रपटाची पोस्टर लावायचा. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमिर खान आपल्या सिनेमाचं अशाप्रकारे मार्केटिंग करताना दिसत आहे.
आमिर खानने 1973 मध्ये आलेल्या यादों की बारात या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
यानंतर तो मदहोश आणि होली या चित्रपटात दिसला. पण खर्या अर्थाने आमिर खानला 1988 मध्ये 'कयामत से कयामत तक' या चित्रपटाद्वारे मोठी लाँचिंग मिळाली.
आमिर खान रिक्षावर पोस्टर चिकटवत असताना काही रिक्षा चालकांनी त्याला पोस्ट लावण्यास नकार दिला. त्याने विनंती केली असता रिक्षा चालक नकार देत निघून जाताना दिसत आहेत.
यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावेळी आमीर सिनेमाच्या प्रमोशनसाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहे.