Monsoon : पावसाळ्यात पंख्याखाली कपडे वाळवल्यानंतरही येतोय वास? मग करा 'हे' काम

Drying Clothes in Monsoon : पावसाळ्यात कपडे कसे वाळवायचे... तुम्हालाही पडतोय का प्रश्न? मग करा हे काम...

दिक्षा पाटील | Updated: Jun 29, 2023, 06:18 PM IST
Monsoon :  पावसाळ्यात पंख्याखाली कपडे वाळवल्यानंतरही येतोय वास? मग करा 'हे' काम title=
(Photo Credit : Freepik)

Drying Clothes in Monsoon :  पावसात कपडे लवकर सुकत नाही या गोष्टीची अनेक महिला तक्रार करतात. त्यात जर कधी आपले सगळे कपडे ओले असले आणि तेच परिधान करण्याची वेळ आली तर आपली चिडचिड होते आणि त्यातही ओल्या कपड्यांचा येणारा वास हा खूप घाण असतो. ओल्या कपड्यांचा वास हा कितीही पर्फ्युम वापरला तरी जात नाही हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळेच बोलतात ना की पावसाळ्यात कपडे सुकवणं खूप मोठं आव्हान आहे. कारण घराच्या बाहेर कपडे सुकवू शकत नाही आणि घरात वाळायला घातले तर एक वेगळाच वास येतो. त्यामुळे अनेक लोक आहेत जे पंख्याच्या खाली कपडे सुकवतात. पण हे करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? चला तर आज जाणून घेऊया पंख्या खाली कपडे सुकवण्याची सवय योग्य आहे की अयोग्य? 

पावसाळ्यात कोरडे कपडेच का परिधान करायला हवे? 
पावसाळ्यात वातावरण हे दमट असतं. ज्यामुळे कपडे लवकर वाळत नाहीत. त्यामुळेच जर तुम्ही कोरडे कपडे परिधान न करता ओले कपडेच परिधान केले तर तुम्हाला त्वचेच्या संबंधीत समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात कधीच ओले कपडे परिधान करू नका. त्यांना आधी चांगल्या प्रकारे वाळू देणं हेच योग्य ठरेल. 

अंतर्वस्त्रांची घ्या विशेष काळजी 
पावसाळ्यात इतर कपड्यांच्या तुलनेत तुमच्या अंतर्वस्त्रांची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात चुकूनही ओले अंतर्वर्स्त्र परिधान करू नका. जर तुम्ही खूप वेळ ओले अंतर्वस्त्र परिधान केले तरप तुम्हाला त्वचेसंबंधीत समस्या होऊ शकतात.

हेही वाचा : "तू देवदूतच आहेस...", Samir Choughule च्या वाढदिवसानिमित्त Prajakta Mali ची खास पोस्ट

कपडे सुकवणं किती योग्य आहे? 
कपडे हवेत वाळवणे ही एक साधारण गोष्ट आहे. मग आपण घरात कपडे वाळवू देत किंवा मग घराच्या बाहेर. पण कपडे घरात वाळवायचं म्हटलं तर त्याला जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे घरातील योग्य ठिकाणी कपडे सुकवण्याचा रॅक ठेवा. जेणेकरून कपडे ओले राहणार नाहीत आणि त्यातून दुर्गंधी येणार नाही. त्यामुळे कपडे सुकवण्यासाठी थंड नाही तर कोरडी हवा असणं महत्त्वाचं आहे. जर कपडे घरात वाळवायचे असतील तर पंख्याखालीच वाळवणे योग्य ठरेल. फक्त कपडे लवकर सुकणार नाही तर त्यासोबतच त्यातून दुर्गंधी येणार नाही. 

कपडे सुकवण्याचा योग्य पद्धत
पावसात कपडे नीट सुकत नाहीत, म्हणून पंख्याखाली जर तुम्ही 3-4 तास कपडे ठेवले तर त्यानंतर त्यांना इस्त्री नक्कीच करा. त्यानं तुमचे कपडे कोरडे होतील. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)