सुशांतसिंग प्रकरणात ईडीची एन्ट्री, रिया आणि शोवितवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. 

Updated: Jul 31, 2020, 05:16 PM IST
सुशांतसिंग प्रकरणात ईडीची एन्ट्री, रिया आणि शोवितवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल title=

मुंबई : सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सुशांतचे वडिल केके सिंग यांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीविरुद्ध तक्रार केली होती. ईडीने बिहार पोलिसांकडून याप्रकरणाची माहितीही मागवली. सुशांतच्या बँक अकाऊंटमधून २५ कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत बिहार पोलिसांकडून माहिती मागवल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं. 

EXCLUSIVE: सुशांत सिंहचे बँक अकाऊंट डिटेल्स उघड, पाहा कुणाला किती पैसे दिले...

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची ईडीकडून चौकशी करावी अशी मागणी आजच केली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवण्यात यावा, अशी भावना मोठ्याप्रमाणावर सामान्यांमध्ये आहे. परंतु, राज्य सरकार त्यासाठी तयार नाही. राज्य सरकारची ही आडमुठी भूमिका पाहता किमान सक्तवसुली संचलनालयाला ED याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी. कारण या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि खंडणीखोरीचा पैलू समोर आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही या प्रकरणाच्या तपासावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. बिहार पोलिसांच्या तपासामध्ये मुंबई पोलीस अडथळे आणत आहेत. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे ही केस सीबीआयला देण्यात यावी, अशी मागणी सुशील मोदींनी केली आहे. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर या सगळ्या वादात बिहार पोलिसांची एन्ट्री झाली. 

'सुशांतसिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर युवा मंत्र्याचा दबाव', भाजपचा गंभीर आरोप