Kareena Kapoor च्या भावाला EDकडून समन्स

कपूर कुंटुंबावर कोसळलं आणखी एक संकट 

Updated: Feb 11, 2021, 04:24 PM IST
Kareena Kapoor च्या भावाला EDकडून समन्स

मुंबई : अंमलबजावणी संचलनालय (ED)कडून  करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) चा चुलत भाऊ म्हणजे रीमा जैन यांचा मुलगा अरमान जैनला मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात समन्स पाठवण्यात आला आहे. अरमान जैन (Armaan Jain)ला टॉप्स ग्रुपशी संबंधीत चौकशीकरता समन्स पाठवण्यात आला आहे. या प्रकरणासंदर्भात मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरमान जैन यांच्या दक्षिण मुंबईतील घरावर धाड टाकली. हा छापा फक्त दोन तास चालला. राजीव कपूर यांचं निधन झाल्यामुळे या प्रकरणाची कारवाई फार काळ करता आली नाही. 

या कारणामुळे ED ने पाठवली समन्स 

या प्रकरणात अरमान जैन (Armaan Jain) यांचं नाव शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा मुलगा विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) सोबत जोडलं गेलं आहे. या प्रकरणात विहंगची देखील चौकशी सुरू आहे. विहंगच्या फोनचा डेटा ED अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी घेतला आहे. या दरम्यान अशा काही गोष्टी समोर आल्या ज्यामुळे तपास वाढविण्यात आला आहे. ED ने यानंतर अरमानच्या घरी छापा घातला असून आता समन्स पाठवण्यात आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Armaan Jain (@therealarmaanjain)

काय आहे हे नेमकं प्रकरण? 

टॉप्स ग्रुपला MMRDA च्या साइट्सच्या सिक्युरिटीचे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. या अंतर्गत टॉप्स ग्रुपला MMRDA च्या साइट्सवर लक्ष ठेवायचं होतं. या दरम्यान ग्रुपच्या एका अधिकाऱ्याने आरोपकरताना म्हटलं आहे की,'जेवढे सिक्युरिटी गार्ड्स दाखवण्यात आले आहेत. तेवढे सिक्युरिटी गार्ड्स प्रत्यक्षात नाही.' याच कारणामुळे टॉप्स ग्रपपला कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्या सरनाईकांची संकंट वाढली आहेत. 

या सिनेमांत दिसला अरमान 

अरमान जैन (Armaan Jain) 'लेकर हम दीवाना दिल' या सिनेमात दिसला होता. तसेच अरमान, 'स्टूडेंट ऑफ द ईयर', 'एक मैं और एक तू' आणि 'माय नेम इज खान' मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून कार्यरत होता.