'मी वयस्कर समजून हात मिळवला अन् तो हवं तिथे हात फिरवू लागला', अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

मनोरंजन क्षेत्र एक असं ठिकाण आह, जिथे प्रत्येक अभिनेत्री किंवा अभिनेत्रीला काही धक्कादायक अनुभव येत असतात. पण अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही सर्वसामान्यांकडून त्यांना हे अनुभव येतात.   

शिवराज यादव | Updated: Oct 6, 2023, 01:52 PM IST
'मी वयस्कर समजून हात मिळवला अन् तो हवं तिथे हात फिरवू लागला', अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव title=

बॉलिवूड, मनोरंजन क्षेत्र एक असं ठिकाण आहे जिथे अभिनेते किंवा अभिनेत्रींना करिअमध्ये एखाद्या क्षणी कास्टिंग काऊच किंवा इतर धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागतं. मोठ्या पडद्यावर किंवा टीव्हीवर झळकणाऱ्या या सेलिब्रिटींबद्दल सर्वसामान्यांमध्ये अनेक गैरसमजही असतात. अशाच गैरसमजामुळे या सेलिब्रिटींना काहीवेळा अनपेक्षित घटनांना सामोरं जावं लागतं. नुकतंच अभिनेत्री ईशा चोप्राने सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीने शरिराल स्पर्श करत छेड काढल्याचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

ईशा चोप्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून घटना उघड केली आहे. ईशाने 10 पानांची एक मोठी पोस्ट शेअर केली असून, याचा सामना करणं आपल्याला फार सहज नव्हतं असं सांगितलं आहे. तसंच या घटनेमुळेच आपण सोशल मीडियापासून दूर होतो असं म्हटलं आहे. 

ईशाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "10 दिवसांपूर्वी गर्दी असणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीने माझ्या शरिराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तो चांगले कपडे घातलेला एक हुशार माणूस दिसत होता. 70 वर्षाय ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि आपली ओळख करुन दिली. यावेळी मी त्याच्याशी हात मिळवला असता त्याने गैरसमज करुन घेतला. माझ्या शरिराला तो हवं तिथे हात लावू शकतो याचं जाहीर निमंत्रण दिलं आहे असं त्याला वाटलं. यानंतर मी अनेक दिवस तणावात होते".

पुढे तिने लिहिलं आहे की "जर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन मी अनुपस्थित असल्याचं पाहिलं असेल तर यामागे तेच कारण आहे. मी स्वत: पूर्पणणे लक्ष केंद्रीत करु शकत नव्हती. माझ्यासह फार विचित्र प्रकार घडत होता. अनेक रात्र मी झोपली नाही किंवा झोपू शकत नव्हती किंवा फार झोपल्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळं मार्गावर आणताना अडचण होत होती".

हे सर्व फार वेगाने घडलं असंही तिने सांगितलं आहे. पण माझं शरीर ज्या वेगाने थंड पडलं ते अद्यापही मला आठवत आहे असं ती म्हणाली आहे. "त्या क्षणी जेव्हा माझ्यासाठी सगळं काही थांबलं होतं. तो सहजपणे निघून गेला," असं सांगताना ईशाने आयुष्यात आपण पहिल्यांदा जेव्हा अशा अनुभवाला सामोरे गेलो होतो त्याची माहिती दिली. 

"या घटनेनंतर मी झोपण्यासाठी बेडवर गेले असता जेव्हा पहिल्यांदा असा अनुभव आला होता तो क्षण आठवला. मी 7 वर्षांची होते. चित्रपट पाहताना मी मधल्या रांगेत बसले होते. त्याचा चेहरा मला अद्यापही आठवतो. ते आठवल्यानंतर मला आजही भीती वाटते," असं ईशाने सांगितलं. 

मी बोटांवर मोजू शकत नाही, इतके हात माझ्या परवानगीशिवाय माझ्या शरिरावर आहेत अशा भावना तिने मांडल्या आहेत. पोस्टच्या शेवटी तिने लिहिलं आहे की, "मला माहिती आहे की, तुम्ही सर्वजण या संभाषणाने कंटाळला आहात. पण विश्वास ठेवा, मलाही कंटाळा आला आहे. हे फार बटबटीत होत आहे असं तुम्हाला वाटत असेल. पण ही पोस्ट वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं का? नसेल तर मग नाही".