VIDEO : अभिनेत्रीचा भल्या पाहटे 'वंदे भारत एक्सप्रेस' नं प्रवास, हुडी घातलेलं असतानाही प्रवाशांनी ओळखलं अन् मग...

Esha Deol Video : अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला... 

दिक्षा पाटील | Updated: Sep 24, 2024, 11:33 AM IST
VIDEO : अभिनेत्रीचा भल्या पाहटे 'वंदे भारत एक्सप्रेस' नं प्रवास, हुडी घातलेलं असतानाही प्रवाशांनी ओळखलं अन् मग... title=
(Photo Credit : Social Media)

Esha Deol Video : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ईशा नेहमीच काही ना काही शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर ईशानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ईशा रेल्वे स्टेशनवर असून ती ट्रेननं प्रवास करताना दिसते. तिच्या या व्हिडीओनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

ईशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओत ईशा ही रेल्वे स्टेशनवर असल्याचं दिसत आहेत. तर स्वत: ची ओळख लपवण्यासाठी ईशानं हूडी परिधान केली आहे. तर ईशा तिचा हा संपूर्ण प्रवास या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवताना दिसली. तर काही चाहत्यांनी तिला स्पॉट करताच तिचा व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ईशानं वंदे भारतमध्ये गेल्यावर तिचे चाहते तिला हाय करू लागले ते सगळं ईशानं तिच्या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ईशानं हा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे की 'ट्रेननं खूप काळानंतर प्रवास करणार आहे. मी वंदे भारतनं जाते.' तर मुंबई सेंट्रलच्या स्टेशनची झलक दाखवत संपूर्ण प्रवास दाखवला आहे. या व्हिडीओवर लोकं खूप कमेंट करत आहेत आणि पब्लिक मोडनं प्रवास करण्याचा तिचा हा अंदाज लोकांना प्रचंड आवडला आहे. ईशाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ईशा सगळ्यात शेवटी 2021 ची शॉर्ट फिल्म 'एक दुआ' मध्ये दिसणार आहे. तर अजय देवगणच्या 2022 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' या थ्रिलर सीरिजमध्ये आणि सुनील शेट्टीच्या हंटर: टूटेगा नहीं तोडेगा' मध्ये देखील ती दिसली होती. 

हेही वाचा : ना रजनीकांत, ना कमल हासन... 'हा' आहे सर्वात लोकप्रिय साऊथ सुपरस्टार! गिनीज बुकात नोंद

ईशा देओलनं याच वर्षी भरत तख्तानीला घटस्फोट दिला. 6 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं याविषयी माहिती दिली होती. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव राध्या तख्तानी असून ती 7 वर्षांची आहे आणि दुसरी मुलगी मिराया तख्तानी ही 5 वर्षांची आहे. माहितीनुसार, मुलींच्या संगोपनात लागणारा सगळा खर्च हा भरत तख्तानी करणार आहेत आणि आई ईशा देओल ही त्यांचा सांभाळ करणार आहे.