अभिनेत्रीच्या अचानक मृत्यूने खळबळ; खाली कोसळताच क्षणात सोडले प्राण

कोणाची कशी वेळ येईल हे आपण काही सांगू शकत नाही. उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा राहिल याची देखील आपण खात्री देऊ शकत नाही.

Updated: Oct 18, 2021, 03:20 PM IST
अभिनेत्रीच्या अचानक मृत्यूने खळबळ; खाली कोसळताच क्षणात सोडले प्राण

मुंबई : कोणाची कशी वेळ येईल हे आपण काही सांगू शकत नाही. उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा राहिल याची देखील आपण खात्री देऊ शकत नाही. त्यात सध्या आपण असा अनेक बातम्या ऐकल्या आहेत, ज्यामध्ये काही कलाकार अचानक हे जग सोडून निघून गेले. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील या गोष्टींवरती विश्वास ठेवणे कठीण देखील कठीण होऊन बसले. 40 वर्षीय अभिनेत्री उमा माहेश्वरीचे रविवारी अचानक हृदय विकाराने निधन झाले.

अभिनेत्री उमा माहेश्वरीला खूप अस्वस्थ वाटत होते आणि मृत्यूच्या काही वेळ आधी ती अचानक कोसळली आणि तिने तिचे प्राण सोडले. तमिळ टीव्ही शो 'मेट्टी ओली' मध्ये उमा प्रमुख भूमीकेत होती. तिच्या आईची भूमिका करणाऱ्या शांती विल्यम्सने आता यावर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे.

उमाच्या मृत्यूवर शांती विल्यम्स म्हणाली, "उमा माहेश्वरी माझ्यासाठी मुलीसारखी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला. एवढ्या लहान वयात लोकांना देव का घेऊन जातो ते मला कळत नाही. जेव्हा आपण अशा गोष्टी घडताना पाहतो, कधीकधी देवाच्या अस्तित्वावर शंका येते. अभिनेत्री चित्रा व्हीजे देखील काही महिन्यांपूर्वी आम्हाला सोडून गेली आणि आम्ही अद्याप ही घटना विसरु शकलो नाही आणि दरम्यान, आता अचानक उमा (उमा माहेश्वरी) देखील गेली."

उमाला काविळचा त्रास

अशी ही माहिती समोर आली आहे की, अभिनेत्री उमा माहेश्वरी गेल्या काही महिन्यांपासून कावीळाने ग्रस्त होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते, परंतु अलीकडेच ती त्यातून पूर्णपणे बरी झाली होती. उमाचे पती मुरुगन हे पशूवैद्यकीय डॉक्टर आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर उमा माहेश्वरीच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.