Poronography Case : Raj Kundra च्या सुटकेनंतर शिल्पा शेट्टीने का केलं मुंडन? ...

शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत 

Updated: Oct 18, 2021, 02:53 PM IST
Poronography Case : Raj Kundra च्या सुटकेनंतर शिल्पा शेट्टीने का केलं मुंडन?   ...

मुंबई : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या प्रत्येक लूकने चाहत्यांना प्रोत्साहित करत असते. शिल्पा शेट्टीचा फॅशन सेन्स, स्टाइल, आऊटफिट कायमच चर्चेत असतात. शिल्पा कायमच आपल्या लुक्समध्ये एक्सपेरिमेंट करत असते. मात्र शिल्पाने आता स्वतःचा मेकओव्हर केलाय. ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

शिल्पाचा नवीन हेअर कट 

शिल्पाने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रील व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये शिल्पा जिममध्ये दिसत आहे. यावेळी ती वर्कआऊट करत नाही आहे. तर ती आपली नवीन हेअरस्टाईल फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की शिल्पाने आपल्या केसांचा मागील भाग मुंडन केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

व्हिडीओसोबत शिल्पाने शेअर केल खास कॅप्शन 

हेअर स्टाइल फ्लॉन्ट केल्यानंतर शिल्पा पुन्हा एकदा एक्सरसाइज करताना दिसत आहे. शिल्पाने आपल्या मेकओव्हर व्हिडीओ खास कॅप्शनसह शेअर केला आहे. शिल्पाने लिहिलं आहे की,'तुम्ही रिस्क घेतल्याशिवाय आणि आपला कम्फर्ट झोन मोडल्याशिवाय तुम्ही दररोज राहू शकत नाही. अंडरकट बझ कट असो किंवा माझी नवीन एरोबिक कसरत: 'ट्राइबल स्क्वॅट्स'. कॅप्शनमध्ये शिल्पाने तिच्या नवीन हेअरस्टाईलचे वर्णन अंडरकट बझ कट म्हणून केले आहे. 

शिल्पाची ही नवीन 'अंडरकट बझ कट' ही हेअर स्टाइल काही युझर्सना आवडली नाही. ते शिल्पाच्या व्हिडिओवर फायर इमोजीसह आपली प्रतिक्रिया देखील देत आहेत.