वयाच्या 59 व्या वर्षी 300 कोटींसाठी 'ही' सेलिब्रिटी पती, मुलाबाळांना सोडायला तयार, म्हणाली - 'मी त्याच्यासोबत...'

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिने केलेल्या वक्तव्यानंतर चाहत्यांचे भुवया उंचावल्या आहेत. फराह खान म्हणाली की, '300 कोटींसाठी ती पती, मुलाबाळांना सोडायला तयार आहे.'

नेहा चौधरी | Updated: May 30, 2024, 01:57 PM IST
वयाच्या 59 व्या वर्षी 300 कोटींसाठी 'ही' सेलिब्रिटी पती, मुलाबाळांना सोडायला तयार, म्हणाली - 'मी त्याच्यासोबत...' title=
farah khan said she can leave her 3 children and husband for 300 crores entertainment marathi news

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कोरिओग्राफीची जादू दाखवली आहे. फराहाने बॉलिवूडमधील तिन्ही खानसोबत काम केलंय. पण शाहरुख खान आणि फराहचा दोस्ती अख्खा इंडस्ट्रीला माहितीय. ती बॉलिवूडमध्ये त्याच्या स्वादिष्ट जेवण्यासाठी आणि विनोदी स्वभावासाठी लोकप्रिय आहे. 

अलीकडेच फराह खान आणि अनिल कपूर कपिलच्या कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये गेले होती. जिथे तिने केल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. या शोमध्ये कपिलने फराह आणि अनिल यांना अनेक प्रश्न विचारले, ज्याला या दोघांनी अतिशय विनोदाने तर काही गार्भियाने उत्तरं दिली. 

फराह म्हणाली की 'मी त्याच्यासोबत...'

या शोमध्ये कपिलने फराह खानला विचारलं की, जर चुकून तिच्या खात्यात 300 कोटी रुपये जमा झाले तर ती काय करेल. कपिलच्या या प्रश्नावर फराहने लगेचच उत्तर देत म्हणाली की, '300 कोटी, सर्वात आधी मी काम करणे बंद करेन आणि निवृत्त होईल.' यानंतर मी माझ्या नवऱ्याला आणि मुलांनाही सोडून देईल'. फराहच्या उत्तरावर न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या अर्चना पूरण सिंह म्हणाल्या, 'मला वाटत होतं की काहीही झालं तरी फराह आपल्या पती आणि मुलांना कधीही सोडणार नाही.' फराहनेही अर्चनाच्या या शब्दांना दुजोरा दिला. अर्चनाने पुढे असेही सांगितले की, फराहला आपल्या मुलांसोबत मजा करताना हे पैसे खर्च करायला तिला आवडेल. अर्चनाच्या या शब्दांवर फराह लगेच म्हणाली, 'काय मजा येईल त्यांच्यासोबत. मी तर टॉप क्रूझकडे जाईन.'

फराहने एका गुपितबद्दल सांगितलं...

या शोदरम्यान फराहने स्वतःशी संबंधित आणखी एक खास गोष्ट सांगितली. ती म्हणाली की, तिच्याकडे बदला घेण्याची एक अनोखी पद्धत आहे. जर फराहला एखाद्याकडून बदला घ्यायचा असेल तर ती त्याला माफ करत नाही, तर त्याला शाप देते. ती पुढे म्हणाली की, 'मी खरं तर बदला घेत नाही, पण मी माझ्या मनातल्या त्या व्यक्तीबद्दल बोलते त्याच नुकसान होओ कारण माझी जीभ काळी आहे.' 'जर कोणी माझे वाईट केलं तर मी मनापासून शाप देते की त्याचे पुढचे 4-5 चित्रपट फ्लॉप होओ.'

दरम्यान कॉमेडियन कपिल शर्माचा कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहिला मिळतो. अनिल आणि फराहसोबत कपिलची मस्ती तुम्ही OTT वर पाहू शकता. दर शनिवारी या शोचा एक नवीन भाग OTT वर प्रदर्शित होतो.