Rasha Thadani Arhaan Khan Realtionship Comment Viral : बॉलिवूड स्टारकिड्स हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोराचा मुलगा अरहान हा सातत्याने प्रसिद्धीझोतात आहे. अरहान खान हा अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिला डेट करत असल्याचे बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी ते दोघेही एकत्र फिरतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता राशा थडानीच्या एका कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
बॉलिवूडचा निर्माता आणि अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोराचा मुलगा अरहान हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. आता अरहानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्याचे कॉलेजचे मित्र दिसत आहे. त्यासोबत त्याची कॉलेजच्या मित्रांसोबत चाललेली मजा-मस्तीही या फोटोतून पाहायला मिळत आहे.
तर एका फोटोत तो काळ्या रंगाचे सूट घालून हसताना दिसत आहे. अरहानने या फोटोला हटके कॅप्शनही दिले आहे. "कॉलेजनंतरची काही दृश्य" असे अरहानने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या फोटोवर त्याची आई मलायकाने कमेंट केली आहे. मलायकाने या फोटोवर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे.
अरहानच्या या फोटोवर त्याची कथित गर्लफ्रेंड राशा थडानीनेही कमेंट केली आहे. राशाने इन्स्टाग्रामवर कमेंट करताना अभिनंदन असे म्हटले आहे. राशाची अरहानच्या पोस्टवरील कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरुन विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान राशा आणि अरहानमध्येही चांगले बॉन्डिंग आहे. ते अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अरबाज खान आणि शूरा खानच्या लग्नावेळी अरहान आणि राशाने एकत्र फोटोंसाठी पोज दिली होती. त्यानंतर ते दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता राशाच्या कमेंटने चर्चांना आणखी उधाण आले आहे. पण अद्याप त्या दोघांनी किंवा आई-वडिलांनी यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.