Farah Khan कडून Bigg Boss 15 चा विनर जाहीर ? सांगितलं कोण आहे नंबर 1

 'बिग बॉस 15' वीकेंड का वार रविवारच्या भागात अनेक पाहुणे आले.

Updated: Oct 18, 2021, 06:09 PM IST
Farah Khan कडून Bigg Boss 15 चा विनर जाहीर ? सांगितलं कोण आहे नंबर 1

मुंबई : 'बिग बॉस 15' वीकेंड का वार रविवारच्या भागात अनेक पाहुणे आले. या दरम्यान, घराच्या आत खूप मजा आली. फराह खान, बप्पी लाहिरी आणि भुवन बाम सलमान खानसोबत स्टेजवर दिसले. शोच्या सुरुवातीला ईशान अय्यर आणि उमर रियाज रिंगणात भिडले. पहिल्या फेरीत दोघांमध्ये जोरदार वादही झाला. या टास्कमध्ये उमर जिंकला. शारीरिक लढतीच्या फेरीत ईशान जिंकला. त्यामुळे दोघांमध्ये टफफाईट झाली.

फराह खान 'बिग बॉस 15' च्या घरात पोहोचली
या सगळ्यानंतर दिग्दर्शक फराह खान 'बिग बॉस 15' च्या घरात आली. सलमान तिला विचारतो की जर तु बिग बॉस असतीस तर तु कुटुंबातील सदस्यांसोबत काय केलं असतंस? यावंर ती म्हणाली की, ती कुटुंबातील सदस्यांना जंगलात घेऊन जाईन आणि म्हणाली असती एका स्पर्धकाला सोबत घेवून जाईन. यानंतर फराह घरी गेली आणि स्पर्धकांना सत्याचा सामना करायला लावला. फराह खानने कुटुंबातील सदस्यांना सांगितलं की, प्रत्येकाने आप-आपल्या नंबरनुसार त्यांची जागा घ्यावी. सगळ्यात आधी स्पर्धक स्थानाच्या शर्यतीत दिसले. यानंतर फराहने कुटुंबातील सदस्यांना त्यांचं खरी जागा दाखवली.

फराह म्हणाली, करण कुंद्रा असेल 1 नंबरवर
यानंतर फराह खानने 'बिग बॉस 15' च्या इतर सदस्यांबद्दलही सांगितलं. तसंच घराबाहेर स्पर्धक कसे दिसत आहेत. हे देखील सांगितलं. याशिवाय त्यांनी करण कुंद्राचं कौतुक केलं. ती म्हणाली की, तो अजूनही अव्वल आहे आणि त्याच्यात विजेता बनण्याची क्षमता आहे. ती पुढे म्हणाली की, तो सतत सक्रिय आहे आणि त्याची प्रगती चांगली आहे. लोकांना त्याचा खेळ आवडत आहे. तसेच त्याची टास्कही प्रभावी असल्याचं सांगितलं.

या आठवड्यात दसऱ्यामुळे कोणीही बेघर झालं नाही, तर तीन जणांना नामांकित करण्यात आलं. आगामी टास्क मजेदार असणार आहेत. दोन दिवसांपूर्वी वरुण सूदने देखील ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की, हा शो फक्त करण कुंद्रा जिंकेल.