शेवटचा निरोप असा द्यावा, श्री देवीची होती इच्छा

श्रीदेवी यांच्या निधनानंतर असंख्य गोष्टी समोर आल्या. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 26, 2018, 05:46 PM IST
शेवटचा निरोप असा द्यावा, श्री देवीची होती इच्छा  title=

मुंबई : श्रीदेवी यांच्या निधनानंतर असंख्य गोष्टी समोर आल्या. 

त्यामध्ये असं लक्षात आलं की, श्रीदेवी यांच्या अनेक इच्छा अपुऱ्या राहिल्या आहेत. जसं की मोठी मुलगी जान्हवी कपूरचा डेब्यु 'धडक' सिनेमा.  तसेच श्रीदेवी यांनी चला हवा येऊ द्यामध्ये आपली एक इच्छा व्यक्त केली होती की त्यांना मराठी सिनेमांत देखील काम करायचं होतं. या दोन इच्छांबरोबरच श्रीदेवी यांनी आपल्याला अखेरचा निरोप का द्यावा याबाबत कुटुंबियांना माहिती दिली होती. श्रीदेवीची ती शेवटच्या प्रवासाची इच्छा व्यक्त केली ती ऐकून तुमच्याही कडा पाणावतील. 

श्रीदेवीला असा हवा शेवटचा प्रवास

श्रीदेवी यांना पांढरा रंग प्रचंड आवडतो. त्यांनी अनेक सिनेमांत पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहे. श्रीदेवी यांनी आपल्या कुटुंबियांना माहिती दिली होती की, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंतिम संस्कारात त्यांना पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवावे असे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्यामुळे त्यांची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे त्यांच्या कुटुंबियांनी ठरवले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव पांढऱ्या मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी सजवले जाणार आहे.

अनेकदा श्रीदेवी यांना आपण सफेद रंगाच्या कपड्यांमध्ये पाहिलं होतं. त्यावरून आपल्याला अंदाज होताच की त्यांना तो रंग किती आवडत होता. श्रीदेवी यांचा 54 व्या वर्षी आकस्मिक मृत्यू झाला. कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले.