Fan Slapped Prabhas on Airport : बाहुबली फेम अभिनेता प्रभास याच्यासोबत एअरपोर्टवर धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एअरपोर्टवर कलाकारांना कायम चाहत्यांचा सामना करावा लागतो. एखाद्या कलाकाराला एअरपोर्टवर पाहून चाहते फोटो काढण्यासाठी घोळका करतात. डॅशिंग आणि तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकविणारा साऊथ इंडियन अभिनेत्या प्रभासला पाहून एक चाहती त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गेली. फोटो काढल्यानंतर तिने प्रभासच्या कानशिल्यात लगावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (female fan slapped prabhas on airport old video again viral on social media)
खरं तर हा व्हिडीओ जुना असल्याचं बोलं जातं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा व्हिडीओ 2019 मधील आहे. प्रभास एअरपोर्टवर दिसला तेव्हा चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. प्रभासनेही चाहत्यांसोबत फोटो काढले. या चाहत्यांच्या गर्दी एक तरुणी होती. तीही प्रभाससोबत फोटो काढण्यासाठी आली. तिने छान फोटो काढला आणि ती निघून गेली. पण जरा वेळानंतर ती परत आली आणि तिने प्रभासच्या गालाला हात लावला.
आपल्या आवडत्या कलाकाराला पाहून चाहते कायम उत्साही होतात. प्रभासला पाहून तिनेही जरा सैरभैर झाली होती. फोटो काढल्यानंतर ती पुन्हा आली आणि तिने प्रभासच्या गालावर जोरदार चापटी दिली. हे पाहून सर्वांना धक्काच बसला. प्रभासलाही कळलं नाही की तिने असं का केलं. प्रभासने गाला हात लावला. तरुणीच्या या कृत्याने सगळं काही सेकंद निशब्द झाले होते. तिने प्रभासला मारल्यानंतर ती किंचाळली देखली. आनंदाच्या भरात तिने हे कृत्य केलं होतं. तिने खरं प्रभासला पाहिलं का म्हणून तिने त्याचा गालावर हात मारला.
फोटो काढणारे आणि तिथे उपस्थिती लोकांना वाटलं तिने प्रभासच्या कानाखाली मारलं. दरम्यान हा जुना व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील telugutiktok_official या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होतो आहे.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.